Published On : Mon, Jul 1st, 2019

कर्मवीर बाबू हरिदास आवळे यांच्या १०३ व्या जयंती

निमित्त म.न.पा.तर्फे अभिवादन

कर्मवीर बाबू हरिदास आवळे यांनी स्वत:ला आंबेडकरी चळवळीला समर्पित केले त्यांचे ध्येय आंबेडकरी विचार व चळवळ यशस्वी करणे होते. त्यांच्या १०३ व्या जयंती निमित्त झोन सभापती कु.विरंका भीवगडे, नगरसेविका सौ.मंगला लांजेवार यांनी कमाल चौक स्थित कर्मवीर बाबू हरिदास आवळे यांच्या प्रतिमेला नगरीच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

Gold Rate
18 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,28,500 /-
Gold 22 KT ₹ 1,19,500 /-
Silver/Kg ₹ 1,70,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याप्रसंगी सर्वश्री. अनिल वासनिक, बेलेकर, निंरंजन नगरारे, अङ गीरीश ढोक, भदन्त नागदीपकर, विजय जामगडे, करुनाकर उके, धर्मदास चंदनखेडे, पुरुषत्तम गायकवाड, गजानन आवळे, उमेश बोरकर, राजकुमार मेश्राम व परिसरातील बहुसंख्य नागरीक उपस्थीत होते.

वसंतराव नाईक जयंती म.न.पा.तर्फे अभिवादन

हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त विधानभवन परिसर स्थित वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला झोन सभापती श्री. अमर बागडे यांनी पुष्पहार अर्पण करुन नगरीच्या वतीने विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी बंजारा समाजाचे नागरिक बहुसंख्येने उपस्थीत होते.

Advertisement
Advertisement