Published On : Sat, Oct 24th, 2020

भंडारा जिल्ह्यात आज 104 रुग्णांना डिस्चार्ज

Advertisement

· 87 कोरोना पॉझिटिव्ह
·बरे झालेले रुग्ण 6768
·पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 7964
·क्रियाशील रुग्ण 995
·आज 02 मृत्यू
· एकूण मृत्यू 201
· रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्के

भंडारा : जिल्ह्यात आज 104 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 6768 झाली असून आज 87 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7964 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्के आहे.

Gold Rate
04 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,60,300 /-
Gold 22 KT ₹ 1,49,100 /-
Silver/Kg ₹ 2,87 100 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आज 772 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 87 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 63 हजार 649 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 7964 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 35, मोहाडी 03, तुमसर 18, पवनी 06, लाखनी 05, साकोली 17 व लाखांदुर तालुक्यातील 03 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 6768 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 7964 झाली असून 995 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 201 झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.52 टक्के एवढा आहे.

नागरीकांना आवाहन

· कोवीडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे, मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.

· साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी 20 सेकंद व्यवस्थित धुवा.

· साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement