Published On : Fri, Jan 31st, 2020

विधानपरिषद पोटनिवडणुकीत 100 टक्के मतदान

Advertisement

489 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

Voting

यवतमाळ : यवतमाळ विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत आज 100 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील सात मतदान केंद्रावर 245 पुरूष मतदार व 244 स्त्री मतदार असे एकूण 489 मतदारांनी शांततेत मतदान केले.

यावेळी दारव्हा येथील मतदान केंद्रावर 44 मतदार (पुरुष – 23, स्त्री – 21), यवतमाळ मतदान केंद्रावर 180 (पुरुष – 87, स्त्री – 93), पुसद मतदान केंद्रावर 57 (पुरुष – 29, स्त्री – 28), राळेगाव मतदान केंद्र 37 (पुरुष – 19, स्त्री – 18), उमरखेड मतदान केंद्र 62 (पुरुष – 32, स्त्री – 30), केळापूर मतदान केंद्र 60 (पुरुष – 29, स्त्री – 31), तर वणी येथील मतदान केंद्रावर 49 (पुरुष – 26, स्त्री – 23),मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतमोजणी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे होणार आहे.