Published On : Thu, Apr 26th, 2018

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या 10 मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्पाला महाऊर्जाची तांत्रिक मान्यता

Shirdi Solar Project

पुणे: शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या 10 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पाला महाऊर्जाने तांत्रिक मान्यता दिली असून या तांत्रिक मान्यतेचे आदेशपत्र राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिर्डी येथे आज संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांना सुपूर्द केले. याप्रसंगी आमदार स्मिता कोल्हे उपस्थित होत्या.

या 10 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शिर्डी संस्थानने मे. मिटकॉन कन्सल्टंसी अ‍ॅण्ड इंजिनिअरींग सर्व्हिसेस पुणे यांना सल्लागार म्हणून नेमले आहे. या कंपनीने सौर ऊर्जा प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या प्रकल्पासाठी लागणार्‍या 40 एकर जागेची निवड करण्यात आली असून प्रकल्पाची अंदाजित किंमत 40 कोटी आहे. हा प्रकल्प आस्थापित केल्यानंतर अंदाजे 4 वर्षात खर्चाचा परतावा मिळेल. या प्रकल्पातून दरवर्षी 197.04 लक्ष युनिटची निर्मिती होणार आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement