Published On : Thu, Mar 4th, 2021

नागपूर,वर्धेतील साडेबारा हजार शेतकऱ्यांकडून १० कोटींचा भरणा

नागपूर: महावितरणकडून शेतकरी बांधवांसाठी सुरु करण्यात आलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानास नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून व्यापक प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही जिल्ह्यातील १२ हजार ६४१ शेतकऱ्यांकडून आतापर्यंत सुमारे १० कोटी रुपयांचा भरणा केलेला आहे. उर्वरित थकबाकीदार शेतकऱ्यांनी पैसे भरावे यासाठी महावितरणनी दोन्ही जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात संपर्क मोहीम सुरु करण्यात आली असल्याची माहिती महावितरणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली आहे.

नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर तालुक्यातील सर्वाधिक८१९ शेतकऱ्यांनी ६२ लाख २६ हजार रुपयांचा भरणा करून कृषी पंपाच्या वीज देयकाच्या थकबाकीतून मुक्तता करून घेतली आहे. सावनेर मधील ७९९ शेतकऱ्यांनी ४८ लाख २८ हजाराचा भरणा केला. काटोल मधील ६३४ शेतकऱ्यांनी १९ लाख ७ हजाराचा भरणा केला आहे. नारखेडमधील ५६३ शेतकऱ्यांनी १९ लाख ७३ हजार,पारशिवनी तालुक्यातील २६८ शेतकऱ्यांनी २१ लाख १५ हजार रुपये, रामटेक तालुक्यातील २१७ शेतकऱ्यांनी १६ लाख २४ हजार, उमरेड मधील ५२५ शेतकऱ्यांनी ५६ लाख ९५ हजार, भिवापूर तालुक्यातील ५४६ शेतकऱ्यांनी ५९ लाख १९ हजार,

हिंगणा तालुक्यातील २८९ शेतकऱ्यांनी ३० लाख ३७ हजार, कामठी तालुक्यातील २५२ शेतकऱ्यांनी ३४ लाख ६ हजाराचा भरणा केला आहे. कुही तालुक्यातील ४५१ शेतकऱ्यांनी ४८ लाख ९७ हजाराचा, मौदा तालुक्यातील ५६७ शेतकऱ्यांनी ४४ लाख ९ हजार, नागपूर तालुक्यातील ७० शेतकऱ्यांनी १ लाख ५५ हजार, नागपूर ग्रामीण मधील ४५६ शेतकऱ्यांनी ३६ लाख ६७ हजार रुपयांचा भरणा केला आहे.

वर्धा जिल्ह्यात वर्धा आणि सेलू तालुक्यात थकबाकी भरण्यासाठी शेतकऱ्यांची चढाओढ लागल्याचे चित्र दिसते आहे. वर्धा तालुक्यात १,६२० शेतकऱ्यांनी ४५ लाख ७९ लाख तर सेलू तालुक्यात १२८७ शेतकऱ्यांनी ६३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. आर्वी तालुक्यातील ६५८ शेतकऱ्यांनी २३ लक्ष ९३ हजार, आष्टी तालुक्यातील ५८७ शेतकऱ्यांनी १४ लाख १८ हजार, देवळी तालुक्यातील ८२० शेतकऱ्यांनी ३१ लाख ८७, हिंगणघाट तालुक्यातील १९२ शेतकऱ्यांनी ९ लाख ४८ हजार, कारंजा तालुक्यातील ४१७ शेतकऱ्यांनी ११ लाख ७७ हजार, समुद्रपूर तालुक्यातील ९६ शेतकऱ्यांनी ७ लाख ४२ हजार रुपयांचा भरणा केला आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात उर्वरित शेतकऱ्यांनी योजनेत जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी केले आहे.