नागपूर : जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री बेझनबाग परिसरात धक्कादायक घटना घडली. मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात दरोडेखोरांनी व्यापाऱ्याला गोळ्या झाडून गंभीर जखमी केले आणि त्याच्याकडील ४ ते ५ लाख रुपयांची रोकड लुटून पोबारा केला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोळीबाराची घटना –
मेकसाबाग येथील रहिवासी व्यापारी राजू दिपाणी हे बुधवारी रात्री रोकड घेऊन जात असताना ही घटना घडली. दोन संशयितांनी त्यांना अडवून पिस्तूलाचा धाक दाखवला. दिपाणी यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केल्यावर दरोडेखोरांनी सरळ गोळीबार केला. यात दिपाणी गंभीर जखमी झाले.
गंभीर अवस्था –
स्थानिक नागरिकांनी तातडीने दिपाणी यांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. घटनेमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलीस तपास –
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून प्राथमिक तपासातून आरोपींनी व्यापाऱ्याच्या हालचालींची पूर्वतयारी केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी हत्या करण्याचा प्रयत्न आणि दरोड्याचा गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली आहे.
View this post on Instagram