Published On : Thu, Jul 16th, 2020

गणेशपेठ बसस्टॅण्डसमोर : कोरोना रुग्णामुळे तब्बल २८ दिवसापासून ५५ दुकाने बंद

Advertisement

File Pic

नागपूर : गणेशपेठ बसस्टॅण्डसमोरील एका निवासी संकुलात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर मनपाने संकुलासमोरील ५५ दुकानांचा परिसर सील केला आहे. रुग्ण सात दिवसातच बरा होऊन शहरात फिरत आहे, पण दुकाने अजूनही सील असल्याने सर्वांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. दुकाने सुरू करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी मनपाकडे केली आहे.

निवासी संकुलात एका फ्लॅटमध्ये १८ जूनला एक कोरोना रुग्ण आढळून आला. या रुग्णाला मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णावर उपचार करून सात दिवसात सुटी देण्यात आली. तो रूग्ण कामानिमित्त आता शहरात फिरत आहे. पण त्याची शिक्षा दुकानदारांना २८ दिवसांपासून भोगावी लागत आहे. रुग्ण आढल्यानंतर मनपाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच दिवशी रस्त्यावरील व्यावसायिक संकुलातील दोन इमारतीचे प्रवेशद्वार कठडे लावून बंद केले.

व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास मनाई करण्यात आली. १९ जूनपासून १६ जुलैपर्यंत दुकाने उघडली नाहीत. या दरम्यान व्यापाऱ्यांनी धंतोली झोनच्या सहायक आयुक्त बागडे यांना निवेदन दिले. त्यांनी सात दिवसात दुकाने सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर १४ दिवसानंतर सुरू करू, असे सांगितले. पण आता २८ दिवस झाल्यानंतरही दुकाने सुरू झाली नाहीत.

Gold Rate
27 June 2025
Gold 24 KT 96,400 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver/Kg 1,07,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement