Published On : Wed, Jun 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर क्राइम ब्रँचची कारवाई; आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीला बेड्या, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

नागपूर : नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत हरियाणा आणि बिहार येथील तीन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि घरफोडीसाठी वापरली जाणारी उपकरणे असा एकूण २२ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाला बाहेरील राज्यांतील काही संशयित व्यक्ती चोरी आणि घरफोडीच्या उद्देशाने नागपुरात दाखल झाल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल्स आणि लॉजमध्ये विशेष तपास मोहीम राबवली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तपासादरम्यान गणेशपेठ परिसरातील एका गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास असलेल्या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. झडती घेतली असता १४३ ग्रॅम सोन्याचे दागिने, ११२ ग्रॅम चांदीचे दागिने, तीन मोबाईल फोन, १० हजार ४५० रुपयांची रोख रक्कम तसेच घरफोडीसाठी वापरण्यात येणारी साधने आढळून आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राजू जसपाल सिंग (हरियाणा), भोला उर्फ बिरेंद्र सुखदेव पासवान आणि राजेश पारस शाह (बिहार) अशी आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात मध्य प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

Advertisement

पोलिस चौकशीत आरोपींनी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमालही याच चोरीशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पुढील तपासासाठी तिन्ही आरोपींना जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges