Published On : Wed, Jun 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात महिला पीएसआय लाचलुचपत प्रकरणात अटकेत; एसीबीची मोठी कारवाई

Advertisement

नागपूर : लाच मागितल्याच्या आरोपावरून नागपूर येथील वाठोडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला (पीएसआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. छेडछाड प्रकरणात कारवाई न करण्याच्या बदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यावर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या महिला पीएसआयचे नाव प्रणाली बेनके असे असून त्या वाठोडा पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. तक्रारदार हे ३२ वर्षीय ट्रॅव्हल्स व्यवसायिक आहेत. एका महिलेचे विमा दाव्याचे काम करून दिल्यानंतर त्याबदल्यात कमिशनची रक्कम मागितल्याने संबंधित महिलेने पैसे देण्यास नकार दिला होता. त्यानंतर तक्रारदाराने तिच्याविरोधात वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तक्रारदाराच्या आरोपानुसार, संबंधित महिलेने पैसे परत करण्याऐवजी त्यांच्याविरोधातच छेडछाडीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी पीएसआय प्रणाली बेनके यांच्याकडे सोपविण्यात आली होती.

तपासादरम्यान कारवाई टाळण्यासाठी आणि तक्रारदाराला दिलासा देण्याच्या मोबदल्यात पीएसआय बेनके यांनी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने फेब्रुवारी २०२६ मध्ये एसीबीकडे तक्रार दाखल केली.

Advertisement

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने मार्च २०२६ मध्ये सापळा रचण्याची तयारी केली होती. त्यावेळी आरोपी अधिकाऱ्याने १० हजार रुपये पोलीस ठाण्यात आणून देण्याची मागणी केल्याचे समोर आले. मात्र एसीबीच्या कारवाईची माहिती मिळाल्याची शक्यता निर्माण होताच त्या रजेवर गेल्याचे सांगितले जात आहे.

प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर एसीबीने वाठोडा पोलीस ठाण्यात पीएसआय प्रणाली बेनके यांच्याविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली असून तपास यंत्रणा प्रकरणाच्या इतर पैलूंचीही चौकशी करत आहे.

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges