Published On : Sat, May 11th, 2019

जि.प. आणि पं.स.च्या पोटनिवडणुकांसाठी 17 मे रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

Advertisement

मुंबई: राज्यातील विविध 7 जिल्हा परिषदांमधील 9; तर 12 पंचायत समित्यांमधील 16 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार याद्या 17 मे 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, या निवडणुकांकरिता 10 एप्रिल 2019 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 17 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून त्यावर 21 मे 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय अंतिम मतदार याद्या 27 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी तसेच मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 29 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका,मतदाराचा चुकून निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशी माहितीही श्री. सहारिया यांनी दिली.

पोटनिवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदनिहाय निवडणूक विभाग असे: रायगड- कळंब (ता. कर्जत), पुणे- बावडा-लाखेवाडी (इंदापूर), अहमदनगर- बारागाव नांदूर (राहुरी), हिंगोली- येहळेगाव तु. (कळमनुरी), वर्धा- झडशी (सेलू) व मांडगाव (समुद्रपूर), भंडारा- ब्रम्ही (पवनी) व पालांदपूर (लाखनी) आणि गोंदिया- आसोली (गोंदिया).

पोटनिवडणूक होणाऱ्या पंचायत समितीनिहाय निर्वाचक गण असे: पेण (जि. रायगड)- वडखळ, पालघर (पालघर)- खैरापाडा, हवेली (पुणे)- वाडेबोल्लाई, कागल (कोल्हापूर)- माद्याळ, देवळा (नाशिक)- महालपाटणे, चाळीसगाव (जळगाव)- मेहुणबारे, नेवासा (अहमदनगर)- सोनई, कर्जत (अहमदनगर)- कोरेगाव, केज (बीड)- आडस, बिलोली (नांदेड)- अटकळी, माहूर (नांदेड)- वाई बा, मुखेड (नांदेड)- जांब बु., औंढा ना. (हिंगोली)- असोला तर्फे लाख, गोरेगाव (गोंदिया)- घोटी, अर्जुनी मोरगाव (गोंदिया)- माहुरकुडा आणि हिंगणघाट (वर्धा)- वडनेर.

Advertisement
Advertisement