मुख्याध्यापक श्री. प्रविण मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
नागपूर: जागतिक कर्करोग निवारण दिनाच्या निमित्याने मंगळवार, दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सोनेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात येथील विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीसाठी तंबाखू, गुटखा, सिगारेट, बिडी, पानमसाला, खर्रा इत्यादी घातक अमली पदार्थांच्या निषेधार्थ ‘तंबाखूची प्राथमिक’ होळी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात शाळेतील मुख्याध्यापक श्री. प्रविण मेश्राम यांनी तंबाखू तसेच इतर सर्व मादक पदार्थांपासून होणारे दुष्परिणाम यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
‘जीवन से नाता जोडो, तंबाखू का साथ छोडो’ तसेच कर्करोगाचे निवारण करण्यासाठी आपण काय केले पाहिजे यावर देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेतील सहायक शिक्षका श्रीमती सुजाता भानसे यांनी व्यसनांच्या कुठल्याही प्रकारच्या सेवनाने शरीरावर अनेक दुष्परिणामावर जसे सिगारेट मूळे फुफ्फुसांचा कँसर, तंबाखूमूळे तोंडाचा कँसर विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी तंबाखू व्यसनमुक्तीची शपथ घेतली. तसेच ‘तंबाखूची पुडी, जणू विषाची पुडी, नाही म्हणा तंबाखूला, सुखी राही संसार’ ‘तंबाखू खाऊन नको मारू चिचकारी, घाणेरडे म्हणतील तुला लोक’ अश्या प्रकारच्या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शाळेतील मुख्याध्यापकांच्या सहकार्यामुळे आरोही बहुउद्देशीय संस्थाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.