Published On : Thu, Jul 16th, 2020

जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष ने घेतला कामठी पंचायत समिती च्या कामकाजाचा आढावा

कामठी :-सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कामठी तालुका प्रशासन कर्तव्य बजावण्यात व्यस्त आहेत यातच आतापर्यंत कामठी पंचायत समिती अंतर्गत विविध विकासकामे लक्ष्यात घेत झालेला खर्चित निधी , थकीत निधी , झालेली विकासकामे , संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचा कामचुकार पणा आदी संदर्भात आज सकाळी 11 वाजता कामठी पंचायत समिती सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मीताई बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या मुख्य उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.

या आढावा बैठकीत 24 विषयावर आढावा घेण्यात आला ज्यामध्ये पंचायत विभाग अंतर्गत जनसुविधा व नागरी सुविधांचे झालेली कामे, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्याया वस्तीचा विकास, ठक्कर बाप्पा व तांडा वस्ती सुधार योजनाचा आढावा घेण्यात आला तसेच ग्रामीण पाणी पुरवठा, मनरेगा, स्वच्छ भारत मिशन, बांधकाम, पंचायत , बांधकाम उपविभाग मौदा,घरटॅक्स व पाणी टॅक्स , वित्त, कृषी, शिक्षण, पशुसंवर्धन, आरोग्य, सहा निबंधक, महावितरण, पंचायत, कृषी , अन्न व पुरवठा विभागाचा आढावा घेण्यात आला.

याप्रसंगी समाजकल्यान सभापती नेमावली माटे, शिक्षण सभापती उज्वला बोढारे, स्थायी समितो सदस्य अवंतिका लेकुरवाडे, विरोधी पक्ष नेता अनिल निधान, जी प सदस्य अनिल निधान, कामठी पंचयात समितो सभापतो उमेश रडके, उपसभापतो आशिष मललेवार, तसेच जी प सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, प्रकल्प संचालक विवेक इलमे, बीडीओ सचिन सूर्यवंशी, प्रकल्प अधिकारी भारती मानकर, गटशिक्षण अधिकारी कश्यप सावरकर यासह अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी