Published On : Thu, Jul 16th, 2020

रामटेक शहरात कोरोनाचा पुन्हा संसर्ग

Advertisement

रामटेक : नगरधन,हिवरा बाजार, मनसर, बोरडा आणि आता , रामटेक शहरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे.

-तब्बल साडेतीन महिने कोरोना पासून लांब असलेल्या रामटेक शहरात कोरोनाचा शिरकाव सुरु झाला आहे…. नगरधन , हिवरा बाजार, मणसर , आणि रामटेक शहरात पुन्हा कोरोनाणे दहशत घातली आहे. शहरात एका मागे एक रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे.

किट्स कॉलेजमध्ये किटस वसाहतीत राहणाऱ्या किट्स कॉलेज।मधील वरिष्ठ लिपिक कर्मचारी ही वडिलांची निधनाची बातमी मिळाल्यानंतर संपूर्ण रामटेक शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आणि लगेच आता महात्मा फुले वॉर्ड रामटेक येथील , पुणे वरून रामटेक येथे परत आलेले पती आणि पत्नी दोघेही कोरोना पोझिटिव आले.
सदर माहिती नुसार पती आणि पत्नी दोघेही 12 जुलै ला रात्री 8.30 च्या दरम्यान रामटेक येथे आले.

आणि 13 जुलै ला त्यांची निरंतर सर्वेक्षण मधे त्यांचे स्व्याब घेण्यात आले. व ते पोझिटिव आले. संपर्कात आलेल्या हाय रिस्क मधे पती पत्नी सह त्यांचे आई वडील, आणि दोन मुले यांना नागपूर येथे पाठवले आहे. आणि लो रिस्क मधल्या लोकांना होम क्वारनटाईन केले असून त्यांचे स्व्याब्ब घेण्यात आले आहे.


संबंधित क्षेत्र प्रतिबंध क्षेत्र म्हणून सिल करण्यात आले होते. व संपूर्ण परिसर स्यानिटाईझ करण्यात आले आहे.
असे मुख्याधीकारी स्वरूप खारगे यांनी सांगितले……रामटेक शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने रोज अनेकांची धावपळ या शहराकडे असते यामुळे शहरात असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.

नुकतेच मिळालेल्या रुग्णाच्या अहवालाने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे,
मुख्याधिकारी स्वरूप खारगे, तालुका वैदकिय अधीक्षक डॉ चेतन नाईकवार, प्रभारी तहसीलदार रमेश कुमरे, रामटेक पोलीस प्रशासन हे परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत..