जिल्हा परिषद-पंंचायत समिती निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती

नागपूर: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी नागपूर जिल्ह्याचे माजी ऊर्जामंत्री व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जि.प. व पं.स. निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागील काळात नागपूर, भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यांचे पालकमंत्री पद यशस्वीपणे सांभाळले. याशिवाय राज्याचे ऊर्जामंत्री म्हणूनही पाच वर्षे जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.

तसेच या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या गाठीशी असलेल्या प्रचंड अनुभव लक्षात घेता पक्षाने त्यांच्यावर निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारीही ते परिश्रमपूर्वक यशस्वी पार पाडतील असा विश्वासही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला आहे.