Published On : Tue, Dec 24th, 2019

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी ११३ उमेद्वारांनी भरले उमेद्वारी अर्ज

पक्षाच्या निष्ठावंत उमेदवारांना बंडखोरीचे ग्रहण

प्रबळ उमेदवारांचीही वाढली धाकधूक

रामटेक: नागपुर जिल्ह्यातील जिल्हा परीषद व पंचायतच्या सर्वत्रीक निवणुकीसाठी आज शेवटच्या तारखेला तहसील कार्यालय रामटेक येथे जिल्हा परिषद चे 52 तर पंचायत समिती 61 उमेदवारी अर्ज असे एकूण ११३ उमेद्वारांनी पाच जिल्हा परीषद गट व दहा पंचायत समिती गणाकरीता अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली. सात जानेवारीला मतदान होत असल्याने दिवस कमी असल्याने उमेदवारांचे टेंशन वाढले आहे.

सर्वच पक्षाच्या उमेदवारासोबत कार्यकर्ते तसेच त्यांच्या हितचिंतकांनी रामटेक तहसील कार्यालयात एकच गर्दी करून मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज भरला.ह्यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता .एबी फॉर्म मलाच मिळेल,मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहो ,मी एकनिष्ठतेने पक्षाचे कार्य केले असे म्हणणाऱ्या काही जणांना आज पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्याने नाराजीची सूरही दिसून आला व त्यांनी सरळ बंडखोरीचा मार्ग स्वीकारला . या बंडखोरीचा फटका नेमका कुणाला बसतो हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे.

काही पक्षाच्या उमेदवारांनी बंडखोरी व गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे चित्र यावेळी निदर्शनास आले .

या निडणुकीत अनेक पक्षात मोठी बंडखोरी झाली असुन निष्ठावंतांना उमेद्वारी न दिल्याने त्यांनी इतर पक्षात प्रवेश करीत उमेद्वारी अर्ज दाखल केला अनेक निष्ठावंताना मनाप्रमाणे उमेद्वारी न दिल्याने त्यानी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे चित्र दिसून आले. त्याचप्रमाणे प्रमुख पक्षातही मोठया प्रमाणात बंडखोरी झाली असुन त्याचा सर्वात मोठा फटका नेमका कुणाला बसणार याचीच सर्वत्र चर्चा परिसरात सूरू आहे.