Published On : Mon, Jan 6th, 2020

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक येत्या 7 जानेवारीला

घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटी घेऊन मतदारांना मागताहेत माताचा जोगवा,भाजप शिवसेना काँग्रेस मध्ये काट्याची टक्कर

रामटेक-होऊ घातलेल्या नगरधन भंडारबोडी जिल्हापरिषद उमेदवार नरेश धोपटे व पंचायत समिती चे उमेदवार अरुण दमाहे , शिवसेनेकडून उमेदवार असून जनतेचा व युवा तरुण मुलाचा प्रचंड संख्येने उत्साह दिसत आहे, तरीही जनतेचा कौल कोणाला हे स्पष्ट पणे दिसून येत आहे,,

या महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे , रामटेक लोकसभेचे खासदार कृपाल तुमाने तसेच रामटेक चे लोकप्रिय आमदार आशिष बाबू जयस्वाल शिवसेनचेच मग तर विकासाची गंगा ह्या क्षेत्रात वाहणारच असे मत बिकेन्द्र महाजन माजी नगरसेवक यांनी सांगितले. ,, माजी सभापती वर्षा धोपटे यांनी देखील आपल्या कार्यकाळात क्षेत्राकारीता विकास केलाच, परंतु त्यापेक्षा जोमाने विकास होणारच कारण राज्यात सत्ता आमची असून विकासाकरिता निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही ह्याप्रसंगी दिली.

माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव ह्यांचे तडफदार भाषणाने जनता प्रेरित झाली असल्याचे चित्र निदर्शनास आले. ह्यावेळी वरिष्ठ नेते व जनता मोठ्या प्रमाणात नरेश धोपटे सोबत असल्याने त्यांनी प्रचारात जोर असल्याचे चित्र दिसून आले…..हक्कासाठी शिवसेनेने नेहमीच लढा दिला आहे.

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. पुढील काळातही शेतकऱ्यांचे हित जोपासणारे निर्णय या सरकारकडून घेतले जाणार असल्याचे प्रतिपादन नरेश धोपटे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.