Published On : Mon, Jan 6th, 2020

दुरंतो एक्स्प्रेसने विद्यार्थाचे पलायन ?

Advertisement

– आरपीएफ आणि टीसीने घेतला शोध

नागपूर: मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, असे प्रत्येकच पालकांना वाटते. त्यासाठी मुलांना योग्य मार्गदर्शन करतात. वेळ प्रसंगी रागावतात आणि जवळही घेतात. मात्र, मुलांचे वय पालकांचा राग समजण्यापलिकडचा असतो. यागैरसमजातून कधी मुले घराबाहेर पडतात. असाच काहीसा प्रकार शनिवारी रात्री नागपूर रेल्वे स्थानकावर घडला. मात्र, आरपीएफ जवान आणि कर्तव्यदक्ष तिकीट तपासणीसाच्या मदतीने त्या विद्यार्थीला दुरंतो एक्स्प्रेसमधून परत आणले.

Advertisement
Advertisement

राजेश (काल्पनिक नाव) असे त्या विद्यार्थाचे नाव आहे. तो नागपुरातील रहिवासी असून ९ व्या वर्गात शिकतो. शनिवारी दुपारी आईने त्याला अभ्यासासाठी रागावले. राग मनात धरून तो सायंकाळी घराबाहेर पडला. थेट नागपूर रेल्वे स्थानक गाठले.

फलाट क्रमांक ८ वरील नागपूर मुंबई दुरंतो एक्स्प्रेसने तो मुंबईकडे निघाला. दरम्यान विष्णु येवले हे कर्तव्यदक्ष तिकीट तपासणीस बी-९ डब्यात तपासणी करीत होते. याच गाडीत आरपीएफ जवान शिवराज पवार आणि विनोद साखरे स्कॉqटगला होते. बडनेरा ते अकोला दरम्यान त्यांना राजेशवर त्यांचे लक्ष गेले. तो एकटाच होता शिवाय त्याच्याजवळ काहीच नव्हते. कर्मचाèयांना शंका आली.

विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. काही वेळानंतर त्याने आईच्या रागावर घराबाहेर पडल्याचे सांगितले. आरपीएफ जवानांनी त्याचा नाव पत्ता विचारल्यानंतर भुसावळ रेल्वे स्थानकावर त्याला घेवून उतरले. नंतर दुसèया गाडीने नागपुरात आणले.

आरपीएफ ठाण्यात कर्तव्यावर असलेले एएसआय सुरेश कामिलकर यांनी त्याची विचारपूस केली तसेच सुषमा ढोमणे यांनी राजेशच्या पालकांना फोन करून तो आरपीएफ ठाण्यात सुखरुप असल्याचे सांगितले. माहिती मिळताच पालकांनी आरपीएफ ठाणे गाठले. तो पर्यंत रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधी ठाण्यात पोहोचले. पालक आल्यानंतर आरपीएफने खात्री केल्यानंतर राजेशला त्यांच्या सुपूर्द केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement