नागपूर – कामठी शहरातील प्रचारसभेत घडलेल्या एका विचित्र घटनेमुळे निवडणुकीचे राजकारण अचानक चांगलेच गाजू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार शाहजहाँ शफावत अन्सारी यांच्या सभेत एका तरुणाने मंचावर जाऊन त्यांच्या अंगावर थेट नोटांचा वर्षाव केला. हा संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला असून तो सोशल मीडियावर प्रचंड वेगाने प्रसारित होत आहे.
अन्सारी भाषण करत असताना हा तरुण अचानक पुढे आला आणि हातभर नोटा काढून त्यांच्या अंगावर उधळू लागला. अन्सारी यांनी त्याला थांबवण्याऐवजी जवळ घेत आभार मानल्याचा दृश्यही त्या व्हिडिओत दिसते. सभेत उपस्थित लोकांकडून या कृतीला उदंड प्रतिसाद दिला गेल्याने संपूर्ण वातावरणच काही क्षणांसाठी बदलले.
त्या तरुणाने स्टेजवरच अन्सारींबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ते सर्वांच्या मदतीसाठी तत्पर असतात, त्यांना कोणत्याही चिन्हाची गरज नाही, असा दावा केला. त्यानंतर पुन्हा एकदा त्याने नोटा वाऱ्यासारख्या उडवत आपला उत्साह दर्शवला.
या घटनेनंतर निवडणूक आयोगाकडून कारवाई होणार का, याबाबत चर्चांना ऊत आला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात घडलेल्या या प्रसंगाने कामठीतील राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची बनली आहेत.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





