सुदर्शन समाजाच्या भवनाकरिता 35 लाख रुपयांचा निधी मंजूर
नागपूर: सुदर्शन समाजातील तरुणांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजना सुदर्शन समाजातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन राज्याचे ऊर्जा उत्पादन शुल्क व नागपूर वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रमा नगर परिसरात आयोजित सुदर्शन समाजाच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
समाज मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे ऊर्जा उत्पादन शुल्क व नागपूर, वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सुदर्शन महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी कामठी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष रंजीत सफेलकर ,उद्योगपती अजय अग्रवाल, शहर भाजपाध्यक्ष विवेक मगतांनी ,राजेश खंडेलवाल,सुदर्शन समाजाचे अध्यक्ष प्रकाश बडेल, मनोज मेथीयां, नरेश कलसे, गेंदलाल कलसे, विजय मेथिया उपस्थित होते.
समाज मेळाव्यात मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सुदर्शन समाजातील नागरिक जिथे राहत आहेत त्यांना स्थायी पट्टे देण्यात येणार असून त्यांना पंतप्रधान घरकुल योजने अंतर्गत घर बांधकामाकरिता अडीच लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सुदर्शन समाजाच्या विविध समस्या आपण प्राथमिक त्याने सोडून समाजाभवन बांधकामाकरिता 35 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले. सुदर्शन समाजातील नागरिकांनी शासनाकडे कामगार नोंदणी केली तर बेरोजगार तरुणांना रोजगार सुद्धा मिळणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज मेथीया यांनी केले संचालन नरेश कलसे यांनी केले व आभार प्रदर्शन विजय मेथोय यांनी मानले. मेळाव्याला समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.