Advertisement
नागपूर : शहरातील वाठोडा परिसरातील काही तरुण हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी येथील तलाव येथे फिरायला गेले होते. या सर्वांना तलावात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. तलावात पोहत असताना खोल पाण्यात गेल्यानंतर यातील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विनीत राजेश मनघटे (वय १८) असे मृत तरुणाचे नाव तो वाठोडा येथे राहतो.
माहितीनुसार, ही घटना सकाळी १० वाजताची असून गावातील तरुणांनी विनीतचा मृतदेह बाहेर काढला आहे. स्थानिकांनी घटनेची माहिती शहर पोलीस नियंत्रण कक्षाला दिली.त्यानंतर हिंगणा पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास सुरु केला आहे.