Published On : Tue, Nov 28th, 2017

मेयो हॉस्पिटल येथे डीन कार्यालयसमोर युवक कांग्रेस चे तीव्र आंदोलन


नागपुर: नागपुर लोकसभा युवक कांग्रेस चे अध्यक्ष व् नगरसेवक बंटी बाबा शेळके तसेच नागपुर लोकसभा युवक कांग्रेस अपंग सेल चे अध्यक्ष कुणाल जोध, उत्तर नागपुर विधानसभा युवक कांग्रेस सोशल मीडिया सेल अध्यक्ष अतुल मेश्राम यांच्या नेतृत्वात मेयो मधील मेस संदर्भात एक निवेदन मयोच्या अधिष्ठाता याना देण्यात आले. पण मयोच्या डीन ने उड़वा उडवीचे उत्तर दिल्यामुळे संतप्त झालेल्या युवक कॉंग्रेस्सच्या कार्यकर्त्यांनी डीन कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले नागपुर लोकसभा युवक कांग्रेस चे अध्यक्ष व् नगरसेवक बंटी बाबा शेळके म्हणाले की या सरकार मध्ये नोंदणीकृत नसलेल्या संस्थेवर सरकार मेहरबान आहे कारण मेयो मध्ये जी मेस/कैंटीन चालविण्याचा कंत्राट दिला आहे ती संस्था नोंदणीकृत नाही या आधीही नोंदणी नसलेल्या आरएसएसला (राष्ट्रिय स्वयंसेवक संघला) नागपुर महानगरपालिकेने फुकटाचा मोबदला देवून संघाच्या रेशिमबाग येथील भिंतीचे कामचे पैसे नागपुर महानगपालिकेने दिले.

आता मेयो हॉस्पिटल मध्ये बेकायदेशीर रित्या नोंदणी नसलेली संस्था मेस चलवित आहे या खाजगी कंत्राटददारा कडून जागेचा किराया पाण्याचे बिल विद्युत् देयक न घेता कुणाच्या मर्जिन ही मेस चलवायला दिली आहे याची पण शहनिशा व्हायला पाहिजे कुठलीही निवेदिता न काढता वर्तमानपत्रात प्रसिद्द न करता खाजगी कंत्राटदाराला दिलेला कंत्राट सम्पूर्ण पने बेकायदेशीर आहे यात कुणाकुणाचे हित संबंध जोपासले आहे याची पण चौकशीची मागणी युवक कांग्रेसने केलि.


युवक कांग्रेस ने शांतपणे अधिष्ठाता याना निवेदन दिले असता समाधानकारक तोडगा व् उत्तर न मिळाल्यामुळे नागपुर लोकसभा युवक कांग्रेस ने आपले रूद्र रूप धारण केले व् परिसरात प्रचंड घोषणाबाजी नारे निदर्शने करूँन मेयो प्रशासनाला ठनकावून सांगितले की ही मेस लवकरात लवकर बंद केलि नाही आणि त्या खाजगी कंत्राटदाराकडून जनतेच्या पैश्याची जी उधळपट्टी झाली ती वसूल केलि नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी चेतावनी बंटी बाबा शेळके यानी दिली.


आजच्या आंदोलनात नगरसेविका आशा नेहरू उइके,उत्तर नागपुर विधानसभा सोशल मीडिया सेल अध्यक्ष अतुल मेश्राम,लोकसभा महासचिव सुशांत सहारे,अल्पसंख्यांक अध्यक्ष फज़लुर कुरेशी,महिला युवती कांग्रेस अध्यक्षा विक्टोरिया फ्रांसिस,वसिम शेख,अक्षय घाटोले,नीलेश देशभर्तार,विक्की बढेल, शेख अजहर,नवेद शेख,स्वप्निल ढोके,सागर चौहान,स्वप्निल बावनकर,हेमंत कातुरे,ममता बोपचे,शालिनी सरोदे,निखिल बालगोटे,राहुल मोहोड़,पियूष खड्गी,विक्की नाटिये,वरुण पुरोहित,नितिन गुरव,दिवाकर पलांदुरकर,विजु हातबुदे,माधव जुगेल,कुणाल जोध,राजेंद्र ठाकरे,पूजक मदने,पुष्पक मदने,सौरभ शेळके,तेजस मून,नितिन सुरुषे,हर्षल शिंदे,निखिल वानखेड़े,पूजक मदने,हर्षल धुर्वे,देवेंद्र तुमने,धीरज धकाते,मोतीराम मोहाडीकर,अंकित गुमगावकर,फैजान खान,आशीष लोनारकर,शिवम् जैस्वाल,स्वप्निल बावनकर,राकेश निकोसे,विजय चौहान,राजेंद्र ठाकरे,धीरज पांडे,हर्षल शिंदे,राहुल फाये इत्यादि युवक कांग्रेस चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्तिथ होते.