Published On : Wed, Dec 20th, 2017

शिधा वाटप कार्यालयावर युवक काँग्रेसचा यलगार मोर्चा


नागपूर: नागपूर लोकसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या नेतृत्वात संघ प्रभागातील केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या निवासस्थानापासून महिला व नागरिकांना घेऊन शिधा वाटप कार्यालय मध्य नागपूर येथे यलगार मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकार,राज्य सरकार, मुख्यमंत्री, मंत्री गिरीश बापट यांच्या मुर्दाबाद चे नारे लाहुन राशन आफिस समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. काँग्रेस सरकारने अन्न सुरक्षा विधेयक संसदेत पारित करुन गोर-गरीब सामान्य जनतेला गहु, तांदूळ, साखर, केरोसीन मिळत होते पण आता भाजप सरकारच्या कार्यकाळात साखर केरोसीन तर सोडा गहु व तांदूळही मिळत नाही शासनाच्या प्राधान्य गट योजने अंतर्गत ज्या कार्ड धारकांच्या कार्डावर प्राधान्य गटाचा शिक्का मारला आहे. त्यांना नियमित अन्न धान्य मिळायाला पाहिजे. पण राशन दुकानदार नागरिकांना अन्न-धान्यापासून वंचित ठेवत आहे.बंटी शेळके यांनी आरोप केला आहे की राशन दुकानदार व राशनिंग अधिकारी यांच्या संगनमताने उघडपणे चालू असलेल्या भष्ट्राचार संघ प्रभागातील संघ प्रमुख मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व संघाचे मुख्यालय येथे हे हाल आहे तर ईतर ठिकाणचे काय ? शेकडो महिला व नागरिकासोबत मोर्चाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले की जो पर्यंत अन्न-धान्य नागरिकापर्यंत वितरण होत नाही तो पर्यंत आम्ही युवक काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. ज्या कार्डधारकांच्या शिधा पत्रिकावर प्राधान्य गटाचा शिक्का नाही. त्यांना नियमाप्रमाणे शिक्का मारून द्यावा योजने प्रमाणे प्रति व्यक्ती ३ किलो गहु व २ किलो तांदूळ दुकानदराने घ्याला पाहिजे पण प्रत्यक्षात असे होत नाही दुकानदार बाहेरच्या बाहेर धान्य विकतो व दुकानदार कार्डधारकांना हाकलून लावतो व POS मशीन चे कारण सांगतो की तुमचे ठसे येत नाही POS मशीनच्या कारणामुळे अन्न धान्य देत नाही. या POS मशीनच्या खरेदी मधे करोड़ो रूपयाचा भष्ट्राचार झाल्याचा संशय आहे.

या आधी नागपूर लोकसभा लोकसभा युवक काँग्रेसच्या माध्यमातून सुमारे ८ हजार कार्डावर प्राधान्य गटाचा शिक्का व RC नंबर लावण्यात आले त्यांनाही दुकानदार अन्न धान्य पुरवठा करित नाही केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारने १ लाख ४० हजार करोडचे भरघोस अन्न धान्य पाठविले आहे असे म्हणत आहे व ८१ करोड नागरिकांना त्यांना धान्य भेटत आहे असे पासवान म्हणाले पण प्रत्यक्षात हा पुरवठा कुठे गेला आहे ? सरळ-सरळ हा भष्ट्राचार आहे व जनतेचा पोटावर लात मारत आहे.महाराष्ट्र शासनाचे अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट हे हा उघडपणे पाहत आहे व दुकानदारांना व अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देत आहे.


बंटी शेळके यांनी आरोप केला की दरमाह ३ ते ३.५ हजार करोड़ रूपयाचा भष्ट्राचार अन्न धान्य वितरण प्रणालीच्या माध्यमातून फडणविस सरकार करित आहे. अधिकारी व दुकानदार हे अन्न धान्य कुठे गड़प करतात याचा उलगडा झालाच पाहिजे.दुकानदार अन्न धान्याचा काळा बाजार करतात त्याचे परवाने रद्द करावे व भष्ट्र अधिकाऱ्यांना त्वरित निलबनाची कारवाई करावी अशी मागणी नागपूर लोकसभा युवक काँग्रेस ने केली आहे या पुढे आपल्या हक्काचा अन्न धान्य मिळण्यासाठी असाच काराभार अन्न धान्य वितरण विभागाकडून व दुकानदराकडून पिळवणुक झाली व वठणीवर आले नाही तर नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांनी तीव्र घंटानाद आंदोलन करण्यात येईल व अधिकाऱ्यांना व दूकानदारांना त्यांची जागा दाखवून देऊ असा ईशारा दिला.


या मोर्चानंतर परिमंडळ अधिकारी श्री जळेकर यांनी प्रभाग १८ मध्ये जागोजागी शिबिर घ्यावे व लोकांच्या घरी जाउन त्यांचे बयाण नोंदवावे व संबधित दुकानदारावर कार्यवाही करावी असे बंटी शेळके यांनी खडसावून सांगितले.या मोर्च्यात सुशांत सहारे,अक्षय घाटोले, राजेंद्र ठाकरे,हेमंत कातुरे,सौरभ शेळके, स्वप्निल बावनकर,सागर चव्हाण,नितिन गुरव, पंकज निमजे,स्वप्निल ढोके,पूजक मदने, हर्षल दूर्वे, देवेंद्र तुमाने, अतुल मेश्राम, मयूर माने, इब्राहिम पठान, आलम इरसाद, सादिक शेख, शारुख नवाब, प्रमिला चटप, अरुणा धंडोरे, वनिता मालखेडे, रमाबाई धकाते,सुनीता कावले,किशोर रामटेके व ईतर परिसरातील शिधाकार्डधारक उपस्तिथ होते.