Published On : Tue, Mar 20th, 2018

पाण्याकरिता महापालिकेच्या विषेश सभेत धडकली युवक काँग्रेस

Advertisement


नागपूर: पाण्याच्या खासगी करनामुळे आधीच जनता त्रस्त आहे. त्यातच एन उन्हाळ्याच्या तोंडावरच शहरातील पाणी समस्या अद्भुवु लागले आहे. उत्तर नागपुरातील पाणी समस्या तर बिकट रुपात झाली आहे.प्रभाग क्र २ मधील नागरिक तर पान्यामुळे त्राहि त्राहि झाले आहे. एक तर नळात पाणी येत नाही, आलेच तर गडुळ व जीव जंतु युक्त पाणी नळातुन नागरिकांच्या घरी येत आहे. त्यातच टैंकर चालकांच्या मुजोरीला सुद्धा नागरिकांना तोड़ द्यावे लागत आहे.

टैंकर माफियांचा आतंक एवढा वाढलेला आहे की, टैंकर मधून पाणी भरन्याकरिता नागरिकांना पैसे मोजावे लागत आहे. या करिता प्राभागातील नगरसेविका नेहा राकेश निकोसे यांनी वारंवार शासनासोबत पत्रव्यवहार केला परंतु निकाल मात्र शून्य राहला. या सर्व समस्या करिता महल स्थित मनपा सभागृहाच्या मुख्य द्वारावर नगरसेविका नेहा निकोसे व युवक कांग्रेस महासचिव राकेश निकोसे यांच्या नेतृत्वात मटका फोड़ आंदोलन केले. या मटका फोड़ आंदोलनाला या वेळी पोलिस प्रशासनाने आन्दोलनकारी महिलांना मार्गावरच अडविन्यात आले. या वेळी जनतेचे रौद्र रूप पाहुन महापालिका प्रशासनाने पांच लोकांचे शिष्टमंडळाला आमंत्रित केले. या वेळी झालेल्या चर्चेत नगरसेविका नेहा निकोसे यांनी OCW प्रशासनाला खड़सावुन सांगितले की येत्या १० जऱ समस्यांचे समाधान झाले नाही तर आक्रामक आंदोलनाचे शस्त्राचा अवलंब करावा लागेल.

या आंदोलनात विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, नगरसेवक जुल्फोंकार भुट्टो, कमलेश चौधरी, दिनेश यादव, स्नेहा निकोसे, भावना लोणारे, परसराम मानवटकर, बटी शैळके, हर्षला साबळे प्रहार जनशक्ती पक्ष शहर अध्यक्ष प्रशांत तन्नेरवार,नगर काँग्रेस कमेटी सचिव चंदू वाकोडकर, युवक कांग्रेस प्रदेश सचिव धिरज पांडे, अजित सिंह, NSUI अध्यक्ष आमिर नूरी, उत्तर नागपुर युवक कांग्रेस अध्यक्ष सतीश पाली, शुभम मोटघरे, राकेश इखार, श्रीकात नायर, सुनिल नादुरकर, सन्तोश खडसे, अजहर खान, अभिजीत ठाकरे, विजय चव्हाण, हर्षल वैद्य,सिमा सहारे, सुरजीत पाल, शेख शहनवाज, रूखु खाला,शहनवाज बाजी, शेख अकबर, राजु कोलते, वकील भाई, सुनिता सरनागत, लक्ष्मी मसराम, सपना येडे, अर्चना रामटेके, टैभुरने ताई, बाड़ा मेश्राम, संगीता शाहु,आदि नागरिक प्रमुख रूपाने उपस्थित होते.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement