हलबा समाजाच्या विराट मोर्चात युवक कॉंग्रेस सामील

Advertisement

Congress joins Halba Samaj Morcha (2)
नागपूर: आदिवासी हलबा समाजाचे आमरण उपोषणला नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेस ने समर्थन दिले होते. आज आदिवासी हलबा समाजानी गोळीबार येथून विराट मोर्चा नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभेवर काढला गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेले हलबा समाजाच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी खूप प्रयत्न केले झाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी हलबा समाजाला आश्वाशन दिले होते की हातमाग मंडळ विणकर लूम जी बंद आहे ती सुरु करू व कोष्टी हाच हलबा आहे.असे विधेयक संसदेत मांडू पण या सर्व आश्वासनाच्या केंद्रीय मंत्र्यांना विसर पडला.

केंद्र व महाराष्ट्र शासनावर हलबा समाजाच्या शेष ईतका भयंकर आहे की हलबा समाजाने विधानसभेवर विराट मोर्चा काढून महाराष्ट्र शासन मुर्दाबाद हलबा एकता जिंदाबादचे नारे लावले।मोर्चात नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके व त्यांचे शेकडो कार्यकर्ते मोर्चात सामील झाले व म्हणाले की कायदे माणसासाठी असते माणूस कायद्यासाठी नसतो माणुसकीला जगवण्यासाठी कायदे असतात।युवक कॉंग्रेस हलबा समाजाच्या हक्कासाठी सदैव लढा देण्यास तयार आहे.


आदिवासी समाजाच्या जातीचा व जात वैधताचा मुद्दा थंड बसत्यात पडून आहे. आर्थिक दृष्ट्या हा समाज कमकुवत आहे.शासना कडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत झाली नाही. समाजाच्या देवस्थानाचा प्रश्न रेंगाळून ठेवला आहे.आदिवासी हलबा समाज हा एकवटला असून मागण्या पूर्ण होत पर्यंत मागे हटणार नाही. मोर्चाला सर्व स्तरावरून पाठिंबा मिळाला. मोर्चात सावनेर कळमेश्वर विधानसभेचे तडफदार आमदार सुनील केदार व नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके प्रामुख्याने सामिल होते. मोर्चाला नगरसेवक रमेश पुणेकर, नगरसेवक नितिन साठवणे, नगरसेवक जुल्फिकार भुट्टो, अशोक धापोडकर, मोतीराम मोहाडीकर,राज बोकडे,राजेंद्र ठाकरे,स्वप्निल ढोके, अक्षय घाटोळे, नितिन गुरव,कृणाल जोध, स्वप्निल बावनकर,अतुल मेश्राम, धीरज धकाते, शेखर पौणिकर,महेश गवते,सुखेश निमजे,अंकेश मोंढरिकर,अंकित गुमगावकर,आश्विन सदावर्ती, कुणाल पार्डीकर,रमेश धकाते,संजय ताबूतवाले, हर्षल मौंदेकर,देवेंद्र कांद्रिकर,अतुल पुणेकर,प्रभाकर धापोडकर,राजेंद्र निमजे,आशीष नंदनकर,सौरभ देवघरे,चंद्रशेखर पाठराबे व असंख्य युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्तिथ होते.