Published On : Sun, Sep 18th, 2022
By Nagpur Today Nagpur News

युवक काँग्रेसतर्फे मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा

Advertisement

– वाडी आणि इंदोरा चौकात युवक काँग्रेस व एनएसयूआयची निदर्शने
– इंदोरा चौक ते पीडब्ल्यूएस कॉलेजपर्यंत युवा आक्रोश रॅली
– बेरोजगारी केक कापून मोदींचा केला निषेध

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी देशभर वाढदिवस साजरा करण्यात आला. मात्र मोदी यांच्या कार्यकाळात वाढती बेरोजगारी बघता बेरोजगारीने बेजार झालेल्या युवकांनी शनिवारी इंदोरा चौक आणि वाडी येथे युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या युवा पदाधिकाऱ्यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनात बेरोजगारी केक कापून मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला. दरम्यान इंदोरा चौक ते पीडब्ल्यूएस कॉलेजपर्यंत युवा आक्रोश रॅली काढण्यात आली. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात नारे-निदर्शने करण्याऱ्या बेरोजगार युवकांचा आक्रोश दिसून येत होता.

Gold Rate
28 July 2025
Gold 24 KT 98,500 /-
Gold 22 KT 91,600 /-
Silver/Kg 1,13,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

इंदोरा चौक येथे नागपूर जिल्हा एनएसयूआयने युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, एनएसयूआयचे राष्ट्रीय सरचिटणीस नागेश करिअप्पा, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, माजी अध्यक्ष आशिष मंडपे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदोरा चौक ते पीडब्ल्यूएस कॉलेजपर्यंत युवा आक्रोश रॅलीच्या स्वरूपात निषेध मोर्चा काढला. आंदोलनाच्या अध्यक्षस्थानी एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पांडे, प्रणय ठाकूर, दयाशंकर शाहू, सौरभ काळमेघ, हर्ष बर्डे होते.यावेळी जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पांडे म्हणाले की, मोदींनी ज्या प्रकारे या देशातील तरुणांना रोजगाराबाबत खोटे बोलले, त्यांनी देशातील तरुणांच्या भावनांशी खेळल्याबद्दल देशातील तरुणांची माफी मागावी.

आंदोलनात सतीश पाली, शिलाज पांडे, निषाद इंदुरकर, गौतम अंबादे, बाबू खान, प्रतिक कोल्हे, निखिल वानखेडे, शेख शहनवाज, शुशांत गणवीर, संतोष खडसे, हसन अली, मृणाल वडीचर, चेतन मेश्राम, रौनक नांदकुमार, इंद्रकुमार जाधव, प्रवीण कृष्णा कांबळे, चैतन्य साज्जा, पराग राऊत, उज्वल खापर्डे, हृतिक नंदेश्वर, पलाश लिंगायत, अंकित बोहत, तन्मय जाधव, आरोन कोचडे, आदित्य रॉय, कुणाल देशमुख, मिथिलेश राजपांडे, अदनान अली, आदर्श लाहोरी, सार्थक कुर्तकोटी, हृतिक मेखनजी, कृष्णा बिंशकर, कृष्णा, कृष्णा, बहुधा. साहिल गायकवाड, सुमित सहारे, बिट्टू बागडे आदी उपस्थित होते.

तसेच वाडी येथे काटोल बायपास टर्निंग रोडवर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनात तसेच यु. काँ.चे नागपूर जिल्हा प्रभारी श्रीनिवास निलमवार, जिल्हाध्यक्ष मिथिलेश कान्हेरे, जिल्हा सरचिटणीस अश्विन बैस, हिंगणा विधानसभा अध्यक्ष अश्विन बैस यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसने मोदींच्या वाढदिवसानिमित्त केक फेकून निषेध व्यक्त केला.

यावेळी वाडी शहराध्यक्ष शैलेश थोरणे, उपाध्यक्ष श्रीकांत ढोणे, ईशाद शेख, शशिकांत थोटे, आशिष मंडपे, योगेश कुमकुमवार, पंकज फाळके, पियुष बांते, निखिल पाटील, अतुल ढेकर, विनोद लंगोटे, सागर बैस, रोहित रेवतकर, मिथुन वायकर, अशोक वायकर, डॉ. फिरोज गडलिंगे, शेख, सुदर्शन ठिसके, सौरभ नाईक, सोहेल खान, हिमांशू बावणे, अश्पाक अहमद, अजय गायकवाड, आकाश गायकवाड, रितेश दिग्रसे, चेतन माहुले व युवक काँग्रेस, नागपूर जिल्हा ग्रामीणचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement