Published On : Fri, Jan 12th, 2018

म.न.पा च्या मुख्यकार्यालयात युवक काँग्रेसने पतंग उडवून नॉयलॉन मांजाची होळी केली


नागपूर: नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या मार्गदर्शनात तसेच नागपूर शहर काँग्रेस कमेटी अनुसूचित जाति जमाती सेल उपाध्यक्ष सुनील जाधव, पूर्व नागपूर ब्लॉक युवक काँग्रेस अध्यक्ष अविनाश डेलिकर व युवक काँग्रेसचे तेजस जिचकार यांच्या नेतृत्वात नागपूर महानगर पालिका मुख्यकार्यालयात पतंग उडवून नॉयलॉन मंजाची होळी करून आंदोलन केले.

नगरसेवक बंटी शेळके म्हणाले. नॉयलॉन मांजाचा विषय गंभीर होत चालला आहे. नॉयलॉन मांजामुळे प्राणी,पक्षी तर मरतात पण अनेक जण मृत्युमुखी पडले व कित्येकाना गंभीर जखमा झाल्या. ह्याला जबाबदार कोण ?

राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देषनानंतर ही नागपूरच्या बाजारात नॉयलॉन मांजाची सर्रास विक्री होत आहे. ही गंभीर बाब आहे ह्याला नागपूर महानगर पालिकाच जबाबदार आहे कारण मांजा तुटल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या मांजामुळे ही कितेकांचा पायांना जखमा झाल्या.

शहरातील विविध बाजारपेठेत नॉयलॉन मांजाची विक्री होत आहे ह्याची कल्पना नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाला नाही आहे का ? जीव घेण्या मांजाचे उपयोग सुरु असणे हे म.न.पा प्रशासनाचे अपयश होत बंदीनंतर ही मांजा उपलब्ध होणे ही दुदैवी बाब आहे. इतरांच्या जीवाशी खेळन्याचा अधिकार यांना कोणी दिला ?

आंदोलनात युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पतंग उडवुन नॉयलॉन मांजा म.न.पा च्या आवारात जाळल्या नंतर नगरसेवक बंटी शेळके हे शेकडो युवक काँग्रेस कार्यकर्त्यांसह म.न.पा आयुक्त अश्विन मृदगल यांना निवेदन दिले व म्हंटले की यावर त्वरित कारवाई करावी व प्रशासनाने ठोस पाउले उचलून अशी व्यवस्था करावी की जेणे करून मांजामुळे अपघात होणार नाही मागे काँग्रेस पक्षाच्या राजवटीत शहरातील मुख्यमार्गावरिल व पुलावर तार बांधले होते त्यामुळे मांजा रस्त्यावर न पड़ता तारावरुन जात होता व नागरिकांचा गळा सुरक्षित राहत होता आयुक्तांना असा उपाय सांगितला व बाज़ारपेठेतिल मांजा वर धाड़ी टाकून मांजा जप्त करावा व नागरिकांची या मांजापासुन सुटका करावी.

आयुक्ताने आश्वासन दिले की आम्ही विभागातर्फे पथक नेमुन कुठल्या कुठल्या विक्रेतांकड़े मांजा आहे यांची कल्पना पोलिस विभागाना देऊ व आपण सूचविलेला उपाय नक्कीच करू व नागरिकांना जखमी होण्यापासून वाचवू. त्यावर बंटी शेळके म्हणाले की नागपूर लोकसभा युवक काँग्रेस ही जनजागृति मोहिमद्वारा फेरी काढून दुकानदारांना व नागरिकांना चायना बनावटीच्या मांजावर बहिष्कार टाकावा. त्यामुळे कोणालाही ईजा पोहोचणार नाही. आंदोलनात प्रमुख उपस्थिती बहुजन समाज पार्टिचे गट नेता नगरसेवक मोहम्मद जमाल, मध्य नागपूर ब.स.पा विधानसभा अध्यक्ष दीपक गजबिये,सुनील जाधव,अविनाश डेलीकर, तेजस जिचकार उपस्थित होते.


या आंदोलनात सुशांत सहारे, रिज़वान रूमवी,अक्षय घाटोले, फजलुर कुरेशी, राजेंद्र ठाकरे, राज बोकडे, विक्टोरिया फ्रांसिस, शालिनी सरोदे, सुनील ठाकुर, अखिलेश राजन, संदीप बक्कसरे,चैतन्य मण्डलवार, निखिल बालकोटे, निखिल वांढरे, प्रफुल इजनकर, शेख अशफाक अली, नितिन गुरव, शानू राउत, हेमंत कातुरे, स्वप्निल बावनकर, विजय मिश्रा, मयूर चिंचोड़े, शेख शाकिब, मुजीब अहमद, मयूर माने, अतुल मेश्राम व असंख्य युवक काँग्रेस कार्यकर्त्याचा सहभाग होता.