Published On : Thu, Feb 27th, 2020

युवा चेतना मंच तर्फे मराठी राजभाषा दिन साजरा

कामठी :-मराठीतील अजरामर कवी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक विष्णू वामन शिरवाळकर कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस” मराठी राजभाषा दिन” मराठी गौरव दिन “युवा चेतना मंच तर्फे रनाळा येथे लोकशाही दैनिक चे वरिष्ठ पत्रकार सुनील चलपे यांच्या अध्यक्षतेत स्वामी विवेकानंद वाचनालय रनाळा येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुस्तक प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन सुनील चलपे यांनी मराठीचा इतिहास व त्यांची पार्श्वभूमी यावर प्रकाश टाकला .तर प्रा. पराग सपाटे यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जीवनावर प्रकाश टाकले व त्यांच्या साहित्याचे महत्त्व स्पष्ट केले .तर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त श्रीकांत अमृतकर यांनी आजच्या काळात मराठी भाषेचे महत्त्व यावर मोलाचे मार्गदर्शन केले .याप्रसंगी मराठी भाषा गौरवपर सामूहिक स्तुती गीत घेण्यात आले .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल नागपुरे सूत्रसंचालन अक्षय खोपे तर आभार प्रदर्शन अमोल श्रावणकर यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता नरेश सोरते अतुल ठाकरे ,रुपेश चकोले, बंटी पिल्ले, विनोद गुडघे, कमलाकर नवले, उमेश गिरी ,आशिष हिवरेकर ,प्रितेश खोपे ,पवन लोंढे, राजेश मोरया ,प्रीती हिवरेकर ,हिमांशू लोंढेकर विनोद कोहळे, नीलेश गाढवे, श्याम मस्के,आदींनी सहकार्य केले.


संदीप कांबळे