
नागपूर : कोराडी परिसरात मंगळवारी उशिरा रात्री खळबळ उडवणारी घटना घडली. डॉमिनोजजवळ 27 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली. शुभम राजेश बेसरे असे मृत तरुणाचे नाव असून तो कोराडीतील श्रीकृष्ण धाम झोपडपट्टी परिसरातील रहिवासी होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. काही हल्लेखोरांनी शुभमला अडवून त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात त्याला टाकून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच शुभमचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कोराडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहिती मिळताच कोराडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपींच्या शोधासाठी तातडीने पथके रवाना करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणात दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...
चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate




