Published On : Mon, Jun 9th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील कान्हान येथे प्रेमिकेच्या चितेत उडी मारण्याचा युवकाचा प्रयत्न; रुग्णालयात उपचार सुरू

Advertisement

नागपूर : कन्हान नदीकाठावरील शांतिघाटावर सोमवारी (९ जून) दुपारी प्रेमिकेच्या अंतिम संस्कारावेळी २७ वर्षीय युवकाने चितेत उडी मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. युवकाचे नाव अनुराग राजेंद्र मेश्राम (रा. हनुमाननगर, कन्हान, पारशिवनी तालुका) असे असून तो सध्या कामठीतील खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहे.

प्रेमसंबंधातून दुःखद शेवट-

Gold Rate
08 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,01,800 /-
Gold 22 KT ₹ 94,700/-
Silver/Kg ₹ 1,15,800/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग आणि अंशिका नितीन खोब्रागडे (१९) यांच्यात प्रेमसंबंध होते. रविवारी (८ जून) संध्याकाळी अंशिकाने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या लहान बहिणीने ही घटना पाहून तात्काळ पालकांना सांगितले. तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी कन्हान पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चितेसमोरच धक्कादायक प्रकार-

सोमवारी दुपारी उपजिल्हा रुग्णालयात अंशिकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कन्हान नदीकाठावरील शांतिघाटावर तिच्या अंतिम संस्काराची प्रक्रिया सुरू होती. यावेळी अनुराग तिथे दारूच्या नशेत पोहोचला आणि चितेत उडी मारण्याचा प्रयत्न केला. उपस्थित नागरिकांनी त्याला अडवले आणि त्यानंतर त्याला कथितपणे बेदम मारहाण केली.

पोलीस आणि नातेवाईक घटनास्थळी-

अनुरागच्या वडिलांनी व भावाने घटनास्थळी पोहोचत पोलिसांच्या मदतीने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त विशाल शिरसागर आणि वरिष्ठ निरीक्षक महेश आंधळे यांनी भेट दिली.

मारहाणीचा आरोप, पोलीस तपास सुरू-

अनुरागच्या कुटुंबीयांनी अंशिकाच्या नातेवाईकांनीच त्याला मारहाण केल्याचा आरोप केला असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीसांनी सांगितले की, अनुराग शुद्धीवर आल्यानंतर त्याचा जबाब नोंदवला जाईल आणि त्यानंतर पुढील तपास केला जाईल.

Advertisement
Advertisement