Published On : Fri, Dec 27th, 2019

विस्फोटों के बीच मुस्कुराते तुम अटलबिहारी थे…

मनपाद्वारे आयोजित अखिल भारतीय हास्य व्यंग कवी संमेलनात रसिक मंत्रमुग्ध

नागपूर: भिन्न विचारों में कर्तव्य निभाते तुम सुविचारी थे, विस्फोटों के बीच मुस्कुराते तुम अटलबिहारी थे अशा प्रकारच्या एकाहून एक सरस काव्य पंक्तिंनी गांधीबाग उद्यानातील उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जंयती व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त गांधीबाग उद्यानात अखिल भारतीय हास्य व्यंग कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

कवी संमेलनाच्या उद्घाटक महापौर संदीप जोशी तर प्रमुख अतिथी म्हणून, आमदार सर्वश्री गिरिश व्यास, विकास कुंभारे, प्रा.अनिल सोले, कृष्णा खोपडे, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, संयोजक तथा ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, नगरसेविका श्रद्धा पाठक, आभा पांडे प्रामुख्याने उपस्थित होते.

कवि संम्मेलनाचे उद्घाटन पर भाषणात महापौर संदीप जोशी यांनी मागील २१ वर्षापासून कविसंम्मेलनाचे सातत्याने आयोजन करण्यात येत असल्याबद्दल संयोजक दयाशंकर तिवारी यांचे विशेष रुपाने अभिनंदन केले.

कवी संमेलनाची सुरूवात राजस्थानमधील विजयनगर येथून आलेल्या अंकिता चिंगारी यांच्या सरस्वती वंदनेने झाली. पहिले कवी म्हणून शहराचे प्रतिनिधीत्व करणारे दयाशंकर तिवारी मौन यांनी आपल्या काव्यप्रतिभेला सुरूवात केली. त्यांनी अटल बिहारी वाजपेयींवर एक गझल ऐकवत रसिकांना रिझवले. गजल होती – ” तेरे तन की रंगत ऐसी है, जैसे गुलाब घुला पारा… आखोंसे छुओ तो शबनम है, हाथों से छुओ तो अंगारा…”

उत्तरप्रदेशमधील आग्रामधून आलेल्या ऐलेश अवस्थी यांनी आपल्या वीर रसातील कवितांनी रसिकांमध्ये जोश भरला. “मेरे मुरझाए चेहेरे की हकीकत जान जाती है, कभी तकलीफ में रहता हूं माँ पहेचान जाती हैं” अशा प्रकारच्या एकाहून एक काव्य पंक्तींना रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. राजस्थान येथून आलेल्या सुरेंद्र यादवेंद्र यांनी आपल्या हास्य व्यंग कवितांनी रसिकांची मने जिंकली. त्यांच्या कवितांनी श्रोत्यांमध्ये हास्यांचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या “देश प्रेम से भर थे, जात पात से परे थे, देश की अखंडता से वीर थे अटलजी, लोभ मोह मोद तो पासंग ना फटकता था, जनता की सेवा में अधीर थें अटलजी” या कवितेला रसिकांनी टाळांच्या कडकडात प्रतिसाद दिला. अकिंता चिंगारी यांनी देशभक्तीपर कविता सादर केल्या. समुचे देश का उनको नमन यू ही नही मिलता, अदब सन्मान का उनको गमन यू ही नही मिलता… वतन की आन की खातिर जो अपनी जान देते है, शहीदों को तिरंगे का कफन यूं ही नही मिलता… अशा प्रकारच्या देशभक्तीपर कवितांनी रसिकांच्या मनात उत्साह संचारला. संपूर्ण उद्यानात देशभक्तीचे नारे निनादू लागले.

मध्यप्रदेशमधील मुरैना येथून आलेल्या तेजनारायण शर्मा यांनीही हास्य व्यंग कविता यावेळी सादर केल्या. त्यांनी वेळ, सरकार, समाज, सध्यस्थिती यावर आपल्या हास्यमैफिलीतून श्रोत्यांची मने जिंकली. ” हम सियासी नवाबों के नवासे नही है, ये सियासत हमें बलम बोलती है… जो सियासत ने बख्शी है, हमको हिकारत, उसी की हकीकत कलम बोलती हैं. अशा प्रकारच्या कविता तेजनारायण शर्मा यांनी सादर केल्या.

इंदोर मालवा येथून आलेल्या ज्येष्ठ कवी सत्यनारायण सत्तन यांनी शब्द संयोजन, वाक्कचातुर्य, श्रुंगार, हास्य, व्यंग, विभत्स या रसांनीयुक्त सादरीकरणांनी रसिकांचे लक्ष वेधले. यांनी सादर केलेल्या सर्व कवितांना रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यांनी सादर केलेल्या “भारत माँ का मान पुजाने वाले तुम संस्कारी थे, भिन्न विचारों में कर्तव्य निभाते तुम सुविचारी थे… धीरोदात्त महानायक स्वयममपी मृगेंद्रधारी थे, विस्फोंटो के बीच मुस्कराते तुम अटलबिहारी थे… अशा प्रकारच्या कवितांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.

कविसंमेलनाचे मंच संचालन नागपूरचे युवा कवी विनोद यादव विद्रोही यांनी खुमासदारपणे केले.

कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. कवी संमलेनातील कवींचा सत्कार महानगरपालिकेद्वारे करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार दयाशंकर तिवारी यांनी केले. कार्यक्रमाला माजी नगरसेवक प्रमोद पेंडके, गिरधारी मंत्री, विपुल मिश्रा, क्षमाशंकर तिवारी, ब्रजभूषण शुक्ला, अमोल कोल्हे, प्रशांत गुप्ता, कल्याण चौबे, अविनाश शाहू, जीतू बाथो, सुनील काबरा, विवेक ठाकूर, राजेंद्र हिरूळकर, विजय नेरकर उपस्थित होते.