Published On : Sat, Jan 18th, 2020

स्वास्थ्य आणि प्रभावी व्यक्तित्त्वासाठी योग आवश्यक : ना. नितीन गडकरी

स्व. भानुताई गडकरी आंतरशालेय सांघिक योगासन स्पर्धा

नागपूर: स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनात स्वास्थ्य चांगले राहणे गरजेचे आहे. स्वास्थ्यासोबतच व्यक्तित्त्वाचा विकासही महत्त्वाचा आहे. स्वास्थ्य आणि प्रभावी व्यक्तित्त्वासाठी योगासने आवश्यक आहेत. योगासनांमुळे जीवनात शांतता प्रस्थापित होते. समाजातील सर्वांसाठीच योगासने उपयुक्त असल्याचे मत केंद्रीय महामार्ग व सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्व. जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ यांच्या वतीने आणि शिक्षण विभाग व वनविकास महामंडळाच्या सहकार्याने आयोजित स्व. भानुताई गडकरी आंतरशालेय सांघिक योगासन स्पर्धेच्या वेळी गडकरी बोलत होते. ही स्पर्धा आज सकाळी यशवंत स्टेडियम येथे प्रचंड उत्साहात पार पडली. याप्रसंगी सौ. कांचनताई गडकरी, योगाभ्यासी मंडळाचे राम खांडवे, नगरसेविका रुपा राय, सुनील सिर्सीकर व अन्य उपस्थित होते.

नागपुरातील शालेय विद्यार्थ्यांवर योगसंस्कार जनार्दन स्वामी योगाभ्यास मंडळातर्फे अविरत सुरु आहे. दीर्घ काळापासून योगासनाच्या क्षेत्रात लक्षणीय कार्य मंडळाने केले आहे. 100 शाळांमधील सुमारे 15000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आज योगासन स्पर्धेत भाग घेतला.

स्पर्धेच्या सुरुवातील गुरुंच्या स्मरणाने सकारात्मक वातावरण निर्मिती झाली. यानंतर एकेक योगासन विद्यार्थी करीत होते. मत्स्यासन, पवर्ततासह, ताडकटी चक्रासन, पादांगुष्ठ वृक्षासन, उष्ट्रासन, पश्चिमोत्तानासन, गोमुखासन, सूर्यनमस्कार, प्राणायाम अशा प्रकारच्या आसनांची प्रात्यक्षिके याप्रसंगी सादर करण्यात आली.

Advertisement
Advertisement