Published On : Thu, Jun 20th, 2019

योगगुरू रामदेवबाबा यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे निमंत्रण

मुंबई: योगगुरू रामदेवबाबा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान भवनात सदिच्छा भेट घेतली.

Advertisement

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाचे निमंत्रण तसेच राज्यभरातील आयोजन याबाबत योगगुरू रामदेवबाबा यांनी चर्चा केली. राज्यातील या उपक्रमात विविध घटक उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सहभागामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद करून समाधान व्यक्त केले.

यावेळी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण व क्रिडामंत्री आशिष शेलार, आमदार राज पुरोहित आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement