Published On : Mon, Jun 21st, 2021

योग म्हणजे समृद्ध जीव जगण्याचा मार्ग : आ.कृष्णा खोपडे

नागपूर : 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्यांने आमदार कृष्णा खोपडे यांनी देखील योग कार्यक्रमात सहभाग घेतला. योगामुळे नुसते शारीरिकच नव्हे तर मानसिक निगा राखण्यात देखील मदत होते. शारीरिक व मानसिक सदृढटा आली की समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग सुकर होतो.

प्रत्येकाने योग करून आपले जीवन सुखी समृद्ध करावे. असा संदेश आमदार कृष्णा खोपडे यांनी यावेळी दिला. पूर्व नागपूरचे मंडळ अध्यक्ष संजय अवचट हे देखील कार्यक्रमात प्रामुख्याने सहभागी होते.

पूर्व नागपुरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकूण 14 ठिकाणी योग शिबिराचे आयोजन केले होते. यात प्रामुख्याने नगरसेवक मनोज चापले, प्रदीप पोहाणे, मनीषा कोठे, दिपक वाडीभस्मे, संजय महाजन, हरीश दिकोंडवार, शंकरराव गायधनी, राजू आचार्य, नामदेव ठाकरे, राजू गोतमारे, वैभव शर्मा, मोहन ठाकरे, मुरलीधर वडे आदींचा समावेश आहे.