Published On : Mon, Jun 21st, 2021

प्रभाग २६मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

नागपूर : नेहरूनगर झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक २६ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. प्रभाग २६ मधील अनमोल नगर शिवाजी पार्क येथे परिसरातील नागरिकांनी योगासन करून निरोगी राहण्याचा संदेश दिला.

भाजपा प्रदेश सचिव तथा स्थानिक नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम, माजी उपमहापौर मनीषा कोठे, नगरसेविका समिता चकोले, सुरेश बारई, अशोक देशमुख, प्रशांत मानापूरे, प्रवीण बोबडे, हर्षल मलमकर, योगेंद्र साहू, राजू गोतमारे, कल्पना सारवे, उमेश उतखडे, पप्पू तितरमारे यांच्यासह बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते. योग शिक्षक श्री. तलमले यांनी उपस्थितांना योग प्रात्यक्षिकाचे धडे दिले.

आज विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे आपल्याच हातात आहे. आपल्या पूर्वजांनी योगसाधना करून आपल्यासाठी महत्वाचा ठेवा उपलब्ध करून ठेवला त्याचा फायदा आजही आपल्याला होत आहे. भारताने जगाला दिलेली योग ही मोठी देण आहे.

देशात नागरिकांना योगाचे महत्व कळावे, त्याचा अंगीकार व्हावा यासाठी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी महत्वाचे कार्य केले. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जागतिक स्तरावर योगाचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे, असे प्रतिपादन यावेळी भाजपा प्रदेश सचिव तथा नगरसेवक ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केले आहे.