Published On : Wed, Jun 7th, 2017

हजारो साधकांच्या उपस्थितीत साजरा होणार ‘विश्व योग दिवस’

Advertisement

Mayor & Commissioner Pawasala Purav Meeting photo 07 june 2017 (3)
नागपूर:
जगभरात २१ जून हा दिवस ‘विश्व योग दिन’ म्हणून साजरा होत असून ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. धंतोली येथील यशवंत स्टेडीयममध्ये हजारो साधकांच्याउपस्थितीत विश्व योग दिवस साजरा होणार असून ‘योगा’च्या प्रचार व प्रसारासाठी कार्यरत संस्थांनी येत्या १२ जूनपर्यंत ते करीत असलेल्या कार्याची माहिती आणि योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देणार असलेल्या योगदानाबाबत लिखित किंवा प्रेझेंटेशन स्वरुपात मनपा उपायुक्त (1) यांच्याकडे सादर कराव्यात, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

बुधवारी (७ जून) मनपा मुख्यालयात ‘विश्व योग दिन’ कार्यक्रमाच्या पूर्वनियोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनोज चापले, उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे सुनील सिरसीकर, प्रशांत राजूरकर, राहूल कानिटकर, आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेचे नवीन खानोरकर, चंदू गिरडकर, इशा फाऊंडेशनच्या उत्तरा मुळीक, वनिता शुकुल, अमर नायसे, हार्टनेस संस्थेच्या किरण चावला, संदीप लांभाडे या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. विश्व योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी लवकरच एक बैठक घेण्यात येणार आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत सर्व झोनचे सहायक आयुक्त आणि विभागप्रमुखांची उपस्थिती होती.