Published On : Thu, Aug 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

येरवडा कारागृहात सिया गोयलला व्हीआयपी वागणूक? केतन अग्रवालच्या कुटुंबाचा गंभीर आरोप

Advertisement

येरवडा कारागृहात सिया गोयलला व्हीआयपी वागणूक? केतन अग्रवालच्या कुटुंबाचा गंभीर आरोप

पुणे : लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालच्या मृत्यूप्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिला येरवडा महिला कारागृहात विशेष सुविधा आणि ‘व्हीआयपी’ वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप केतनच्या कुटुंबीयांनी केला आहे. या आरोपांमुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

केतनच्या कुटुंबीय आणि मित्रांनी येरवडा कारागृह प्रशासनाकडे या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. नियमांचे उल्लंघन करून आरोपीला विशेष सुविधा दिल्या जात असतील, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी हे दोघेही सध्या येरवडा कारागृहात आहेत. या कथित विशेष वागणुकीविरोधात संगीता तिवारी यांच्या नेतृत्वाखालील ‘गुलाबो गँग’ आणि ‘पायल तिवारी बिटिया फाउंडेशन’ने पुण्यात आंदोलन केले होते. कारागृहातील आरोपींना देण्यात येणाऱ्या कथित सवलती तात्काळ थांबवण्याची मागणी आंदोलकांनी केली.

दरम्यान, राज्य सरकारने या हत्येचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यास मंजुरी दिली आहे. सिया आणि चेतन यांनी असत्यशोधक चाचणी घेण्यास नकार दिल्याने तपासाला वेगळे वळण मिळाले आहे. न्यायालयानेही या चाचणीसंदर्भातील पोलिसांचा अर्ज फेटाळला आहे.

Advertisement

आता पुणे ग्रामीण पोलीस तांत्रिक आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेत आहेत. तपास यंत्रणेकडे चार हजार चारशेहून अधिक दूरध्वनी नोंदी, डिजिटल पुरावे आणि सीसीटीव्ही चित्रफिती असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील तपासात कोणते पुरावे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.