Published On : Tue, Jul 21st, 2015

यवतमाळ : मुलीला जबरदस्ती उचलुन अत्याचार करण्याचा प्रकार फोन मुळे टळला

Advertisement


पुसद (यवतमाळ)।
एक मुलगी सायकलचे ब्रेक तुटल्यामुळे ते दुरूस्तीसाठी रेस्ट हाऊस परिसरातील एका सायकल दुरूस्ती करण्यासाठी थांबली असता तेवढयात दोन मुले आलेत आणि त्या मुलीला जबरदस्ती उचलुन तिच्यावर अत्याचार करण्यासाठी धनकेश्वर परिसरात घेवुन गेले असता फोन आला व ते मुले पळुन गेल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवार दुपारी घडली.

पुसद शहर पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीवरून शहराजवळी रेस्ट हाऊस परिसरात दुपारी 2.30 वाजताच्या दरम्यान शाळेत शिकणारी मुलीगी सायकल घेवुन इटवा वार्डातील आपल्या राहत्या घरी जात असतांना रेस्ट हाऊस परिसरात सायकलचा ब्रेक तुटला होता. तो ब्रेक दुरूस्ती करण्यासाठी रेस्ट हाऊस परिसरातीलच एका सायकल दुस्तीच्या दुकानाजवळ ब्रेक बसविण्यासाठी थांबली असता आरोपी शेख शाहरूख शेख मुनीर व शेख अबरार हे आपल्या मोटर सायकल क्र. एम.एच. 29 ए.बी. 6431 ने त्या मुलीजवळ आले व तिला जबरीने मोटर सायकलवर बसुन धनकेश्वर मंदीरामागे घेवुन जावुन हात पकडुन जोर जबरदस्ती करून अत्याचार करण्याचा प्रयत्न करित होते. तेवढयातच आरोपीताला फोन आल्यामुळे ते दोघेही पळुन गेले. त्यामुळे त्यांचा डाव फसला आहे.

मुलीचे वडील विठठ्ल भिमराव ठाकरे वय 45 वर्शे रा. विठाळा वार्ड यांनी पुसद शहर पोलीसांना दिलेल्या रिपोर्टवरून आरोपी मुले हे त्या मुलीचा पाठलाग नेहमीच करित असल्याचे सुध्दा लिखीत दिले आहे. त्यावरून पुसद शहर पोलीसांनी आरोपी शेख शाहरूख शे. मुनीर व शेख अबरार यांच्या विरूध्द भादविचे कलम 363,354,अ, 354, ड, 34 व लैंगीक अपराधापासुन सरंक्षणचे कलम 8,12 नुसार गुन्हा दाखल केला असुन आरोपीला ताब्यात घेतले असुन त्यांचा पिसीआर घेणे सुरू केले आहे. या प्रकाराचा तपास ठाणेदार धनंजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विशाल बहात्तरे तपास करित आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Gold Rate
10 May 2025
Gold 24 KT 94,700/-
Gold 22 KT 88,100/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Representational pic

Representational pic

Advertisement
Advertisement