Published On : Sat, Sep 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

यवतमाळच्या मोहदा येथे बैलपोळा उत्साहात; शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने साजरा केला सण

बैलजोडींची पूजा करून विशेष बक्षिसांचे वितरण; पारंपरिक संस्कृती जपण्याचा संदेश
Advertisement

Auto Draft

यवतमाळ: केळापूर तालुक्यातील मोहदा येथे बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने आणि शांततेत उत्साहात साजरा करण्यात आला. नेहरू युवा विद्यार्थी संघ, मोहदा आणि स्व. बापुजी धोपे स्मृती प्रित्यर्थ आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थ, शेतकरी आणि युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मोहदा येथील हनुमान मंदिर परिसरात पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधिवत बैलांची पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सजवलेल्या बैलजोडींची मिरवणूक काढण्यात आली. तसेच सहभागी बैलजोडी धारकांना विशेष बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी केळापूर रेवैयाह, उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा रामबीन बन्सल, तहसीलदार राजेंद्र इंगळे, वाहतूक नियंत्रण उपशाखेचे प्रकाश तायडे, कृषी अधिकारी चव्हाण, मंडळ अधिकारी प्रशांत घरडे, मोहदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच मुकेश लक्ष्मीनारायण धोपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे हरिहरभाऊ लिंगनवार, जिल्हा शांतता समितीचे सदस्य रिजवानभाई शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

बैलपोळा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सण असून शेतीच्या कामात मोलाची भूमिका बजावणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा आहे. या माध्यमातून ग्रामीण संस्कृती, सण-उत्सव आणि शेतकरी-बैल यांच्यातील नाते पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, हा आयोजनामागील उद्देश असल्याचे संयोजक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रेमजित लक्ष्मीनारायण धोपे यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष उत्तम जाधव, उपाध्यक्ष विनोद काकडे, सचिव सुभाष जीवणे, कोषाध्यक्ष सचिन लोहिया यांच्यासह समितीचे सदस्य आणि युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

यवतमाळहून विनोद पत्रे यांचा रिपोर्ट

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.