Published On : Tue, Jul 7th, 2015

यवतमाळ : मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत अर्ज आमंत्रित

Advertisement

madrasa_story-647_070215021123
संवाददाता / मक़सूद अली

यवतमाळ। मुस्लिम समाजाच्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सुरु करण्यात आली असून त्यासाठी इच्छूक मदरसांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

मदरसांव्दारे देण्यात येणाऱ्या धार्मिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. मुस्लिम समाजाच्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व मदरसांना पायाभूत सुविधा व ग्रंथालये इ.शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement

या योजनेत प्रामुख्याने धर्मादाय आयुक्त व वक्फ बोर्डाने नोंदणीकृत मदरसा यांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान, मदरसामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांने मानधन व ग्रंथालयांसाठी अनुदान दिले जाणार आहे.

इच्छुक मदरसांनी यासाठी दिनांक 15 नोव्हेंबरपर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे अर्ज करावे. योजनेतील तरतुदीनुसार तीन डीएड, बीएड शिक्षकांना मानधन देण्यात येईल. हिंदी, इंग्रजी, मराठी, उर्दु यापैकी एका माध्यमाची निवड करून त्यानुसार शिक्षकाची नेमणूक करणे आवश्यक आहे. ग्रंथालय तसेच शैक्षणिक साहित्यासाठी पहिल्यांदा 50 हजार व त्यानंतर प्रतीवर्षी 5 हजार अनुदान दिले जातील. पायाभुत सुविधांसाठी 2 लाख रुपयांचे अनुदान देय आहे. एकाच प्रयोजनासाठी पुन्हा अनुदान दिले जाणार नाही. ज्या मदरसांना एसपीक्युइएम या केंद्र पुरस्कृत योजनेचा लाभ मिळाला आहे. अशा मदसांना पुन्हा लाभ दिला जाणार नाही. मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जांचाच विचार केला जातील.

याबाबतची अधिक माहिती व अर्जाचे नमुने http://mdd.maharashtra.gov.in या राज्य शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मदरसांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement