पुसद (यवतमाळ)। पुसद तालुक्यात अवैध वाहतुकदारी पुन्हा डोके वर काढले असून शेळ्या, मेंढया, कोंबळ्या प्रमाण अवैध वाहतुक सुरु असून याला पोलिसांची मुकसंमती असल्याचे दिसत आहे. शहरातील वर्दळीच्या ठिकाणावरून अवैध वाहतूकदार प्रवासी भरत असल्याने सामान्य जनतेला व पादचार्याना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पुसद शहरातील पुसद वाशीम रोडवर शिवाजी शाळा असून या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या मोठया प्रमाणात आहे 12 वाजता शाळा सुटल्यानंतर रस्त्यावर विद्यार्थींची सायकल व मोटरसायकली घेवून मोठी गर्दी रोडवर होत असते या ठिकाणी एकही वाहतूक शिपाई तैनात दिसत येत नाही पुसद ते वाशीम रोडवर प्रमाणावर अवैध वाहतुक सुरु असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यवतमाळ व नागपुर रोडवरील शिवाजी चौकातील गणेश हॉटेलजवळ प्रवासी वाहतुक करणार्यांना वाहनासाठी थांबा दिल्याने काही चिडीमार वाहनधारक या रोडवरून जानारया तरुणीशी अश्लील भाषेत संभाषण करून चिडीमारी करीत असल्याने समजते. त्यामुळे हे वाहनतळ दुसरीकडे हटविण्यात यावे अशी मांगणी जनतेतून होत आहे. याच रोडवर फुलसिंग नाईक महाविद्यालय असून इतरही काही महाविद्यालय आहे या रस्त्यावर परिसरात सध्या रोडरोमीची टवाळगीरी ऊत आला असून याकडे पोलिसाचे दुर्लक्ष होत आहे. काही ट्रवहल्स धारक दुकानासमोर गाड्या लावत असल्यामुळे व्यावसाईकांना त्रास होत आहे. यावर पुसद पोलिसांनी लगाम कसावा अशी अपेक्ष असतांना ते अकार्यक्षम ठरत आहे. अपघता घडल्यानंतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी जावून पंचनामा करून आपले सोपस्कार पूर्ण करतो. अवैध वाहतुकीवर आळा घालण्याकरिता कोणतीही ठोस उपाययोजना आखली जात नाही. दिवसेदिवस अवैध वाहतुकीने कहर केला असून या अवैध वाहतुकीमुळे पुसद शहरातील वाहतुक व्यवस्थापूर्णत विस्कळीत झाल्याने चित्र आहे.