Published On : Sat, Jul 25th, 2015

नागपूर : मिहान प्रकल्पाला फडणवीस शासन देत आहे गती

Advertisement

Bawankule
नागपूर। गेल्या 15 वर्षापासून मिहान प्रकल्प हा विकासापासून वंचित ठेवण्याचे काम तेव्हाच्या आघाडी शासनाने केले. आघाडी शासनाच्या धोरणामुळे मिहाण चे काम हे रखडलेले होते. मिहान मधील अनेक औद्योगिक प्रकल्प हे मागे पडले होते. त्यामुळे नागपुर जिल्यासह विदर्भात बेरोजगारीचे प्रमाण वाढत गेले. मिहान कधी सुरु होणार? व रोजगाराच्या संधी केव्हा सुरु होणार? या कडे लक्ष लाऊन विदर्भातील सुशिक्षित तरुण एक आशा मनात ठेवत होता. कॉंग्रेस राष्ट्रवादी शासनाने विदर्भ विकासाकडे व मिहान प्रकल्पकडे दुर्लक्ष केले. परंतु जनतेची भाजपा- सेना युतीला जनमत कौल दिला व भाजप- सेना युती शासनाने मिहान चा मुद्दा उचलुन त्याकडे अधिक भर दिला.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मां.ना. देवेन्द्र फडणवीस व पालकमंत्री मां.ना. चंद्रशेखर बावनकुले यांच्या अथक प्रयत्नातून मिहान विकासाला गतीचे नव्हे तर नवीन जीवनदान मिळाले आहे. मिहानच्या टेक ऑफिससाठी 1508 कोटी देण्याचा महत्व पूर्ण निर्णय शासनाने केला तो अतिशय स्वागतार्ह आहे. मिहान प्रकल्पातील औद्योगिक प्रकार्नाकरिता फास्ट ट्रक कोर्ट स्थापण करणार असून प्रकल्पबांधीत कुटुंबातील प्रतिनिधीस नौकरीची संधी किंवा पाच लाखाचे अनुदान त्याच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे. यामुळे औद्योगिक प्रगती आणि विदर्भात समृद्धी येणार हे मात्र निश्चित आहे. मिहान प्रकल्पाकरिता 1998 पासून सुरु असलेले पुसंपादन करण्यात आले आहे होते. या निर्णयनुसार पुनार्वानाचाय लाभ मिळण्याची अंतिम पुन्हा 2013 मध्ये अखेरचे भूसंपादन करण्यात आले होते. या निर्णयानुसार पुनार्वानाचाय लाभ मिळण्याची अंतिम तारीख 8 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग लगतच्या शेतकर्यान कडुन प्रकल्पासाठी जमीन संपादीत करण्यात आली होती. त्या शेतकर्यांना मूळ जमीनी पैकी 1250 टक्के जमीन राष्ट्रीय महामार्गालगतच विकसित करून परत दिली जानर आहे. शिवाय खापरी व शिवनगांव या सारख्या गावाच्या पुनर्वसनाचे प्रश्न सुद्धा मार्गी लावले आहे. झोपडपट्टीत वास्तव्य असलेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याकरिता 1000 चौ. इतका भूखंड देण्यात येणार आहे. शेतकऱ्याला त्याच्या जमिनी पैकी 1250 टक्के जमीन फक्त विकास शुल्क देऊन मिळावा येईल.

मिहान प्रकापामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याकरिता शासन विशेष प्रयत्न करीत आहे. तसेच नवीन उद्योगांना अनेक सवलती सुद्धा युती शासनाने जाहीर केल्या आहेत. त्यामुळे नवीन उद्योग मोठ्या प्रमाणात येतील अशी अशा आहे. भजपा-सेना युती शासन नागपुर जिल्ह्यासह विदर्भविकासाच्या बाबतीत गर्भियाने प्रयत्नशील असून मिहान मधील औद्योगिक प्रकल्पांना पाणी, विज व सर्व पाया भूत सुविधा उपलब्ध करून देत आहे. केंद्रीय मंत्री मा. ना. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वामध्ये मिहान विकासाला विशेष भर देण्याकरिता संयुक्त समिती नेमण्यात आली आहे. शासनाच्या या महत्वपूर्ण निर्णयाचे व नागपूर जिल्ह्यासह विदर्भ विकासा च्या हालचाली कडे विशेष लक्ष देणारे व त्यासाठी प्रयंत्न करणारे नेतृत्व म. ना. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचे अभिनंदन आज झालेल्या नागपुर जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत करण्यात आले. यावेळी या ठिकाणी नागपूर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष डा. राजीव पोतदार यांच्या राजीव पोतदार यांच्या नेतृत्वात आ. समीर मेघे, आ. आशीष देशमुख, आ. रेड्डी, आ. सुधीर पारवे, मा. श्रीकांत देशपांडे, किशोर रेवतकर आदि सह सर्व जिल्हा भाजपाचे कोअर पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement