Published On : Mon, Aug 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

यशोधरानगरमध्ये २८ ग्रॅम एमडीसह तिघांना अटक; सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

Auto Draft

नागपूर -अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच आहे. यशोधरानगर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत एमडीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून २८ ग्रॅम एमडी, दुचाकी आणि मोबाईल असा सुमारे सव्वा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यशोधरानगर पोलीस ठाण्याचे पथक रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना बीट मार्शलला ऑटोमोटिव्ह चौकाजवळ काही जण एमडीची तस्करी करण्याच्या उद्देशाने थांबल्याची गोपनीय माहिती मिळाली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात घेराव घालत कारवाई केली. यावेळी ऋतिक उपवंशी, पियूष वाघ आणि देवांग सुनारे या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून २८ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली. यासोबतच एक दुचाकी आणि मोबाईल फोनही पोलिसांनी ताब्यात घेतला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे सव्वा तीन लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

दरम्यान, आरोपींनी एमडी कुठून आणली आणि ती पुढे कोणाला विक्री करण्यासाठी नेण्यात येत होती, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.