Published On : Mon, Aug 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

‘कहानी वंदेमातरम की’ नृत्यनाटिकेचा शानदार शुभारंभ

'वंदे मातरम्'च्या १५० व्या वर्षानिमित्त नागरिकांची उदंड उपस्थिती
Advertisement

‘कहानी वंदेमातरम की’ नृत्यनाटिकेचा शानदार शुभारंभ

नागपूर:: अमर राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ यास १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक औचित्यावर, नागपूर महानगरपालिका व राधिका क्रिएशनतर्फे ताराराणी फाउंडेशन निर्मित ‘कहानी वंदेमातरम की’ या हिंदी नृत्यनाटिकेचा भव्य शुभारंभ १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी झाला.

रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याचे उद्घाटन मनपाच्या स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नृत्यनाटिकेचे लेखक श्रीधरराव गाडगे, प्रमुख अतिथी राजेश लोया, प्रा. रवींद्र भुसारी आणि निर्माते संजय पेंडसे व्यासपीठावर उपस्थित होते.

‘कहानी वंदेमातरम की’ नृत्यनाटिकेचा शानदार शुभारंभ

सोहळ्याचा प्रारंभ श्री वेदामृत गुरुकुलमच्या विद्यार्थ्यांनी उच्चारलेल्या मांगलिक वेदऋचांच्या पठनाने झाला. यामुळे संपूर्ण सभागृहात चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले. ‘वंदे मातरम्’ गीताच्या विविध ओळींवर आधारित अप्रतिम नृत्याविष्कार कलाकारांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. वंदे मातरम् गीताचा प्रेरणादायी इतिहास आणि त्याचा स्वातंत्र्यसंग्रामातील प्रवास व्हिडिओ माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आला. देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या या संगीतमय व नाट्यमय कलाकृतीचा नागपूरकर रसिकप्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घेतला आणि कलाकारांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.