Published On : Wed, May 9th, 2018

यश बोरकर अपहरण व खून प्रकरण; मारेकऱ्याला फाशीची शिक्षा

Santosh Kawde and Yash Borkar

नागपूर: दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी ११ वर्षीय साहील ऊर्फ यश नितीन बोरकर याचे अपहरण व खून करणारा क्रूरकर्मा आरोपी संतोष रामदास काळवे (२५) याला नागपूर सत्र न्यायालयाने बुधवारी फाशीची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. सी. मुनघाटे यांनी हा निर्णय दिला.

मृतक यश हा पाचवीत शिकत होता . त्याचे वडिलांचा सलूनचा व्यवसाय आहे. आई गृहिणी असून मोठी बहीण शिक्षण घेत आहे. घटनेच्या दिवशी यश घराजवळच्या परिसरात खेळत होता. दरम्यान, आरोपीने त्याचे अपहरण केले. यशला आरोपीच्या मोटरसायकलवर बसून जाताना दोन लहान मुलांनी पाहिले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मिहान परिसरात यशचा मृतदेह आढळून आला होता. न्यायालयात आरोपीतर्फे अ‍ॅड. संतोष चांडे तर, सरकारतर्फे अ‍ॅड. विजय कोल्हे यांनी बाजू मांडली.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ही घटना ११ जून २०१३ रोजी घडली होती. त्यावेळी आरोपी खापरी येथे भाड्याच्या खोलीत राहून मिळेल त्या ठिकाणी मोलमजुरी करीत होता. परंतु, त्याने वस्तीतील लोकांना तो पोलीस असल्याचे सांगितले होते. आरोपी मूळचा दापोली (काळवे), ता. मालेगाव, जि. वाशीम येथील रहिवासी आहे .

Advertisement
Advertisement