मुंबई – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती उत्तम असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे गडकरी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन सांगण्यात आले आहे. गडकरी यांची प्रकृती उत्तम असून शिमला येथील रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांची नियमित तपासणी केली असल्याचेही या अकाऊंटवरुन सांगण्यात आले आहे. त्यामुळे गडकरी यांच्या प्रकृतीबाबत पसरविण्यात येणाऱ्या खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी पूरी तरह से स्वस्थ हैं। शिमला में डॉक्टरों ने उनकी नियमित स्वास्थ जांच की। इसको आधार बनाकर गडकरी जी के स्वास्थ से जुड़े भ्रामक खबरे फैलाई जा रही है, ऐसी खबरों पर ध्यान न दे।
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) May 1, 2019
हिमाचल प्रदेशच्या किनौरमधील सांगला येथे प्रचारसभा आटोपल्यानंतर नितिन गडकरी कुफरीला परतत होते. यादरम्यान गडकरींची प्रकृती अचानक बिघडली. गडकरी हे छराबडा येथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. शिमल्याहून आयजीएमसीचे डॉक्टरांचे एक पथक तातडीने छराबडा रवाना झाली होती. त्यामुळे गडकरींची प्रकृती बिघडली, अशा बातम्या सोशल मीडियावर पसरल्या. तसेच, अनेक न्यूज पोर्टलवरही आल्या होत्या. मात्र, याबाबत गडकरींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती देण्यात आली आहे. तसेच गडकरी यांची प्रकृती उत्तम असल्याचेही सांगण्यात आले.