Published On : Fri, Jun 5th, 2020

जागतिक पर्यावरण दिवस सामाजि क वनीकरण रामटेक व्दारे साजरा

रामटेक : – सामाजिक वनीकरण परिक्षे त्र रामटेक व्दारे जागतिक पर्यावरण दिन व वटपोर्णिमा निमित्य महिलाना वट वृक्षाचे वाटप व त्यांच्या हस्ते वृक्षरोपन करून सोशल डिस्टसिंगचे पालन आणि महत्व स्पष्ट करित जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

शुक्रवार दि.५ जुन २०२० ला सामा जिक वनीकरण परिक्षेत्र रामटेक व्दारे खैरी बिजेवाडा रोपवाटीका येथे जागति क पर्यावरण दिन व वट पोर्णिमा निमित्य कार्यक्रमाचे आयेजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा के व्ही बोलके वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीक रण परिक्षेत्र रामटेक, प्रमुख अतिथी मा मोतीराम रहाटे अध्यक्ष ग्रामिण पत्रकार संघ कन्हान, मा प्रमोद वानखेडे अघ्यक्ष आपात्काळ सामाजिक संघटना कन्हान, मा अशोक बनकर आपात्काळ सामाजि क कार्यकर्ता, जी आर खंडाईत वनपाल रामटेक, मा एस डी गडलिंगे वनपाल मौदा, मा एस आर तांबे वनरक्षक, मा डी सी बोरकर लिपीक, पी ए रामटेके वन मजुर आदीचे वृक्ष रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. पत्रकार रहाटे हयानी पर्यावरण, वृक्षरोपन, वृक्ष संगोपन आणि आपात्काळ संघटनेचे अशोक बनकर यांनी कोरोना आजारावर मात करण्या करिता हात स्वच्छ धुण्याचे तंत्र व सोशल डिस्टसिंगचे महत्व सांगितले. कार्यक्रमा चे अध्यक्ष मा बोलके सर यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्व, पर्यावरणाचे रक्ष ण करणे, जास्तीत जास्त वृक्ष लागवट करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. महिलाना वटवृक्ष रोपटे वाटप व त्याच्या हस्ते वटवृक्ष रोपन करून जाग तिक पर्यावरण दिन व वट पोर्णिमा कार्य क्रमासह साजरा केला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन वनरक्षक एस आर तांबे यांनी तर आभार वनपाल जी आर खंडाईत हयानी व्यकत केले. याप्रसंगी खैरी बिजे वाडा येथील नागरिक, खाजगी जमिनी वर वनशेती करणारे लाभार्थी, स्थानिक महिला मंडळ सदस्या, रोपवाटिकेत व रोपवनात काम करणारे मजुर वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.