Published On : Fri, Jun 5th, 2020

पतीराजांच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्यवतीचे वटवृक्षाला साकडे

सुरक्षित अंतर राखून

सुहासीणीची वटसावित्री पौर्णिमा ठिकठिकाणी उत्साहात
” सात जन्म हाच पती मिळावा म्हणून तसेच पतीच्या दीर्घायूश्यासाठी सौभाग्यवती स्त्रियानी केला वटपौर्णिमाचा व्रत उपवास

रामटेक-भारतीय संस्कृतीत आणि कौटुंबिक जीवनात पतीला परमेशवराचे स्थान असून सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुश्यासाठी दरवर्षी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात.यावर्षी लॉकडाऊन मुळे संभ्रमावस्था निर्माण झाली होती. परंतु याही वर्षी पारंपरिक पद्धतीने महिलांनी वडाची पूजाअर्चा करून वटपौर्णिमा साजरी केली.-

बहुतांश महिलांनी घरीच पूजाअर्चा केली.श्रद्धाळू ,हौशी आणि मनोभावे पारंपरिक पद्धतीने जीवन जगणाऱ्या महिलांनी मात्र घराजवळील वडाच्या झाडाची पतीच्या दिर्घआयुष्याची कामना करीत पूजा केली. यावेळी सुरक्षित अंतर राखून, वडसावित्रीचा सण महिलांनी साजरा केला. सात जन्म हाच पती मिळावा म्हणून तसेच पतीच्या दीर्घायूश्यासाठी सौभाग्यवती स्त्रिया वटपौर्णिमाचे व्रत उपवास करतात .या व्रतात वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारून दोऱ्याचे वेष्टन दिले जाते .वटवृक्षची मनोभावे पूजा करून वाण लुटले जाते असे मत ह्या प्रसंगी मोठ्या उत्साहात नगरसेविका चित्रा धूरई ,सुरेखा माकडे ,वनमाला चौरागडे , लता कामडे हितेश्री शरणागत व इतर सुहसिनीनी दिले .

सत्यवानाचे प्राण यमाने हरले .सती सावित्रीने यमदारातुन सत्यवानाचे प्राण भूतलावर आणले .पौराणिक आधार लाभलेल्या या सौभाग्याच्या लेण्यात सवाष्ण महिला पतीराजांच्या दीर्घायुष्यासाठी सुंदर वेशभूषा परिधान करून वटसावित्रीची पूजा करून व्रत ठेवले. हिंदू संस्कृतीत मराठी वर्षातील जेष्टय नक्षत्रावर येणारे महिलांसाठीचे हे सण मोठया उत्साहात साजरे करतात. मराठी संस्कृतीत महिलांच्या सणाचे विशेष आकर्षण असते.पुरातन काळापासून महिला सर्वाच्च ठरल्या आहेत .वटपौर्णिमा करवाचौत, गौरी पूजन, कोळीपूजा यासारखे सण महिलांचे महत्वाचे व उपवासाचे सण सण आहेत. सौभाग्याचे कुंकु अबाधित राहून पतीप्रेमाची साक्ष देणारे काही सण महिलांच्या आनंदाची जणू पर्वणीच असते.

सुवासिनी सोबत पूजेला जाणाऱ्या कुमारिकाही हात जोडून मनोकामना करून जणू निर्व्यसनी , देखणा व रुबाबदार पती मागत असाव्यात असे त्यांच्या उत्सकतेवरून दिसून येते.त्याग आणि विश्वासाचे प्रतीक हे वटपौर्णिमा व्रत ठरले आहे. आधुनिक युगातही ह्या सणाबद्दलची महिलांची उत्सुकता आजही कायम असल्याचे निदर्शनास येते.जन्मोजन्मी हाच पती मिळावा ही प्रार्थना करत पतीच्या दिर्घयुष्यासाठी जणू वटवृक्षाला साकडे घालून मोठ्या उत्साहात महिलांनी हा सण साजरा केला.

मोठ्या संख्येनी माहिलांनी उपस्तिथी दर्शवल्याने त्यांची जणू ह्या सणा विषयी उत्सुकता बघावयास मिळाली .ह्यावेळी प्रवीना मर्जिवे ,मंजिरी येरपुडे ,नीता टेटे ,सौ .चकोले ,.दीपाली बीडवाईक ,दर्शना धूरई ,मेघा रायपुरकर ,,सुनीता शेंडे , , शितल चिंचोलकर, हितेश्री शरणागत, पायल शरणागत , नन्दा मर्जिवे आदी सूवसिणीनी मनोभावे पूजा करून मोठ्या हर्षोल्लसात हा सण साजरा केला .