Published On : Mon, Jul 8th, 2019

कामठीत ‘चड्डी बनियान’टोळी सक्रिय

कामठी :-नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 अंतर्गत येणाऱ्या कामठी पोलीस स्टेशन मध्ये मागील काही दिवसांपासून चोरी तसेच घरफोडीच्या घटनेला उधाण आले

असून काल रात्री 1.30 दरम्यान 10 ते 12 लोकांनी ‘चड्डी बनियान ‘ टोळीच्या भूषेत येरखेडा येथील सोनू बिअर बार च्या मागील असलेल्या सिद्दीकी कुटुंबियाच्या घरात दरोडा घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली मात्र वेळीच घरमंडळींनि केलेल्या मज्जावातून प्रतिकार करीत शेजाऱ्यांनी घेतलेल्या मदतीच्याअ धावेतून या दरोडेखोरांनो घटना स्थळाहुन पळ काढण्यात यश गाठले असले तरी शहरात चड्डी बनियान टोळी सक्रिय झाल्याची चर्चा जोमात सुरू आहे.

घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठले मात्र तोवर ही टोळी पळ काढण्यात यशस्वी झाली होती दरम्यान या सिद्दीकी कुटुंबियाच्या घरचे सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी केली असता काही इसम फक्त ‘चड्डी बनियान ‘परिधान भूषेत दिसले. मात्र यासंदर्भात सिद्दीकी कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदविली नसली तरी या परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातुन पोलीस गस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली.

संदीप कांबळे कामठी