Published On : Wed, Nov 28th, 2018

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची कार्यशाळा

Advertisement

नागपूर :. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या पूर्वतयारीसाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची कार्यशाळा बुधवार (ता.२८)ला महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून सेंटर फॉर सेस्नेटेबल डेव्हल्पमेंट संस्थेच्या लिना बुधे, स्वच्छ मंचच्या अनसुया छाब्रानी, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अशोक पाटील, सुभाष जयदेव, पशुचिकित्सक डॉ.गजेंद्र महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्र शासनाद्वारे स्वच्छ सर्वेक्षण २०१९ सुरू होत आहे. यासाठी ‘कचरा विलगीकरण’ या विषयावर मार्गदर्शन केले. ओला कचऱ्यापासून खत निर्मितीवरही त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

यंदा स्वच्छ सर्वेक्षण हे सर्व्हिस लेव्हल, फीडबॅक, डायरेक्ट ॲक्शन या विषयावर जास्तीत जास्त गुण अबलंबून आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ बाबत मनपाचे अनित कोल्हे यांनी माहिती दिली. नागरिकांच्या तक्रारींबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या तक्रारी किती सोडविण्यात आल्या याचा आढावा झोनल अधिकाऱ्यांमार्फत घेण्यात आला. यावेळी दहाही झोनचे झोनल अधिकारी, व स्वास्थ निरिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.