Published On : Tue, Aug 18th, 2020

काम बंद काम बंद नगर परिषद कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Advertisement

रामटेक -महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी व संवर्ग संघटनेचे राज्य सचिव गोविंद तुपट यांचे नेतृत्वात नागपूर जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत कर्मचारी आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून 17 ऑगस्टला काम बंद आंदोलन करण्यात आले..

आंदोलन करण्यामागच्या महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव गोविंद तुपट यांनी मागन्याचे निवेदन दीले….

1:- शासकीय कर्मचारी प्रमाणे 100% वेतन कोषागार मार्फत देणे
2:- सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता रोखीने..

3:- अंतिम टप्प्यातील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे कार्यरत नगरपरिषद मध्ये समावेशन.

नगर परिषदे मधील लिपिक वरिष्ठ लिपिक पाना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करणे शिपाई पाणी पुरवठा इत्यादी वर्ग चार कर्मचारी यांना पदोन्नती देणे… सफाई कामगारांना पदोन्नती देणे त्यांना मोफत घरे बांधून देणे शासकीय सुट्टीच्या मोबदला देणे. कर्व प्रशाला आणि अग्निशमन सेवेतील कर्मचारी यांना 4200 ग्रेड पे लागू करणे.. सहा सर्व रंगाच्या निवड श्रेण्या पूर्णजीवित करणे नगर अभियंता उपमुख्य अधिकारी यांना राज पजित दर्जा देणे.

एक सर्व गावातील 25% जागेवर नगर परिषद कर्मचाऱ्यांचे कोणत्याही परीक्षा न घेता विनाअट समावेश करणे, स्थापन होऊन तात्काळ पदस्थापना देणे 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करणे, 500 लोकसंख्येला एक सफाई कर्मचारी याप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांची नव्याने भरती करणे, सर्व नगर परिषद यांच्या नवीन जनगणनेनुसार नव्याने आकृती बंध निर्माण करणे, कोरोनाविषाणू चा सामना करता मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांना 50 लक्ष रकमेचा लाभ देणे व त्यांच्या वारसांना नोकरी देणे, सुट्टीच्या दिवशी काम करणार्‍या प्रत्येक कर्मचाऱ्याला सुट्टीचा मोबदला अथवा बदली सुट्टी देणे. हे निवेदन राज्य सरकार तसेच प्रत्येक जिल्हाधिकारी, व उपविभागीय अधिकारी तसेच मुख्याधिकारी यांना देण्यात आले होते परंतु यासंदर्भात कोणीही लक्ष न दिल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. असे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव गोविंद तुपट यांनी सांगितले..

या आंदोलनात महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव गोविंद तुपट यांचेसह रामटेक नगर परिषदेचे कर्मचारी विजय पडोळे , फाले, आनंदराव ठाकरे, दीपक आकरे, मनोज चींटोले, राजेश चींटोले, राकेश खीचर , लीला खंडाते, अनिता पैसा डे ली , अशोक पैसा डे ली मंजुषा मेंदूलकर, किरण बेहेरे, व सर्व रामटेक नगर परिषद चे कर्मचारी सहभागी झाले होते..